Goat Farming : शेतकरी नियोजन - शेळीपालन

सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील नजीर नबीलाल शेख हे मागील चार वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडे २० एकर शेती असून त्यापैकी २ एकरांवर नेपिअर, दशरथ गवत आणि मका पिकाची लागवड आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

शेतकरी ः नजीर नबीलाल शेख

गाव ः काशीळ, ता. जि. सातारा

एकूण शेळ्या ः ९०

शेळ्यांची जात ः बीटल

सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील नजीर नबीलाल शेख हे मागील चार वर्षांपासून शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडे २० एकर शेती असून त्यापैकी २ एकरांवर नेपिअर (Napier Fodder), दशरथ गवत आणि मका पिकाची (Maize Crop) लागवड आहे. शेळीपालनास सुरवात करण्यापूर्वी त्यांनी शेळ्यांच्या विविध जाती आणि व्यवसायातील सर्व बाबींचा अभ्यास केला होता. त्यातून पंजाबी बीटल जातीच्या शेळ्यांचे संगोपन आणि अर्थशास्त्र योग्य वाटल्यामुळे या शेळ्यांची निवड केली.

Goat Farming
Goat Farming : तुम्हाला शेळ्यांच्या या जाती माहिती आहेत का?

पंजाब येथून सुरुवातीला २० शेळ्या आणि १ बोकड विकत आणत व्यवसायाची सुरुवात केली. पुढे टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत नेली. शेळ्यांच्या संगोपनासाठी ९० बाय ५० फुटाचा बंदिस्त गोठा उभारला आहे. आज शेडमध्ये बीटल जातीच्या लहान-मोठ्या मिळून सुमारे ९० शेळ्या आणि उत्तम पैदाशीसाठी २ बोकड आहेत.

मागील चार वर्षांच्या शेळीपालनातील अनुभवातून सर्व कामे नियोजन करणे सोपस्कर झाले आहे. वर्षभर शेळ्यांची खरेदी-विक्री सुरू राहते. ग्राहकांच्या मागणीनुसार शेळी, बोकड तसेच पिल्लांची विक्री केली जाते. वर्षाला साधारण ३०० ते ४०० नगांपर्यंत विक्री होते. बोकडास प्रति किलो ५०० रुपये तर शेळी ६०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. पिल्ले साधारण २० ते २५ किलोची तर शेळी गाभण व व्यायल्यानंतरही विक्री केली जाते.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजन- शेळीपालन

व्यवस्थापनातील बाबी

 शेळीपालनात प्रत्येक बाबींचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक असते. शेळ्यांच्या अपेक्षित वाढीसाठी संतुलित खाद्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे.

 शेडमध्ये पहाटेपासून कामांना सुरूवात होते. सुरुवातीला शेळ्या बाहेर काढून शेड स्वच्छ केला जातो.

गाभण शेळ्या वेगळ्या ठेवून त्यांचे खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन केले जाते.

 पिल्ले जन्मल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ केले जाते. नाळ व्यवस्थित कापून त्याजागी आयोडीन लावले जाते. नवजात पिल्लांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घेतली जाते. पिल्लांच्या वाढीनुसार त्यांना दूध दिले जाते.

थंडीमध्ये पिल्लांना स्वतंत्र वेगळ्या खोलीमध्ये उबदार वातावरणात ठेवले जाते.

 थंडीच्या दिवसांत शेडमध्ये थंड हवा येऊन शेळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. परिणामी शेळ्या कमी खाद्य खातात. त्यामुळे अपेक्षित वजन मिळत नाही. त्यासाठी हिवाळ्याच्या सुरुवातीला शेड सर्व बाजूंनी बंदिस्त ठेवण्यावर भर दिला जातो. शेडमध्ये उबदार वातावरण कसे ठेवता येईल यासाठी काळजी घेतली जाते.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजन- शेळीपालन

शेळ्या आणि बोकडांच्या वयानुसार शेडमध्ये वेगवेगळे कप्पे केले आहेत. जेणेकरून त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे सोयीचे होईल.

 पावसाळ्यात शेडमधील जमीन ओलसर होते. त्यामुळे शेळ्यांच्या खुरांना जखमा होण्याची शक्यता असते. गोठा कोरडा राहण्यासाठी भाताचे तूस टाकले जाते. तसेच शेडमध्ये शेळ्यांना बसण्यासाठी माचे तयार केले आहेत.

विक्री नियोजन

 विक्री व्यवस्थापन दोन पद्धतींमध्ये चालते. यात शेडमध्येच शेळ्या तयार करून योग्य वजन मिळाल्यानंतर त्यांची विक्री होते. तर दुसरीकडे पंजाब येथून दर महिन्याला दीड ते २ वर्षे वयाच्या ६० ते ७० शेळ्यांची खरेदी करून आणल्या जातात. शेडमध्ये ३ ते ४ महिने दर्जेदार खाद्य दिल्यानंतर योग्य वजन मिळते. त्यानंतर त्यांची स्थानिक मार्केटसह म्हैसूर, केरळ आणि बंगलोर येथील मार्केटमध्ये विक्री केली जाते.

 स्थानिक मार्केटमध्ये जिवंत शेळीला साधारण ६०० रुपये तर राज्याबाहेरील मार्केटमध्ये ६५० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

 बोकडांच्या वंशावळीनुसार आणि गुणवत्तेनुसार अधिक दर मिळतो.

योग्य खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनानंतर शेडमधील पाच महिने वयाच्या शेळीचे साधारण ३० ते ३५ किलो वजन भरते.

 वर्षभर शेळ्या, बोकड आणि पिल्लांची खरेदी-विक्री सुरूच असते.

 सणाच्या दृष्टीने काही बोकडाचे स्वतंत्र नियोजन करून संगोपन केले जाते.

खाद्य नियोजन

 अपेक्षित वजन मिळविण्यासाठी खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. शेळ्यांना दररोज हिरव्या चारा, सुका चारा आणि खुराक दिला जातो.

 सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीन भुसकट तर ओल्या चाऱ्यामध्ये मेथीघास, दशरथ, मका, सुपर नेपियर, सुबाभूळ, शेवरी यांचा वापर केला जातो. खुराक तयार करण्यासाठी मका, सोयाबीन, शेंगदाणा पेंड यांचे मिश्रण तयार करून दिले जाते.

 दररोज शेळ्यांच्या वजनानुसार १० टक्के खाद्य दिले जाते. तर बोकडास १ किलो खुराक दिला जातो.

 सकाळी साडेसात वाजता सुका चारा, ९ वाजता खुराक आणि दुपारी ओला चारा दिला जातो.

आरोग्य व्यवस्थापन

 शेडमधील शेळ्या आणि बोकडांना वर्षभर वेगवेगळे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे लहान-मोठ्या शेळ्या आजारास बळी पडण्याची प्रमाण कमी होते.

 तीन महिन्यातून एकदा जंतनाशकाची मात्रा दिली जाते.

 तीन वर्षे वयाच्या शेळ्यांना पीपीआरचे लसीकरण केले जाते.

 पावसाळ्याच्या सुरुवातीस ईटी चे लसीकरण केले जाते.

- नजीर शेख, ७७७४०८२७३१, (शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com