अशी घ्याल नवजात करडांची काळजी!

करडू निरोगी राहून चांगली वजनवाढ मिळण्यासाठी करडाचे योग्य संगोपन महत्त्वाचे असते. करडाचे व्यवस्थित संगोपन करण्यासाठी वयोगटानुसार वर्गीकरण गरजेचे आहे.
Goat kid management, Goat Farming information in Marathi
Goat kid management, Goat Farming information in Marathiagrowon

शेळी व्यायल्यानंतर बरेचदा नवजात करडास स्वतः चाटून साफ करते. परिणामी करडे तर स्वच्छ होतातच सोबतच त्यांचे रक्ताभिसरणही वाढते. शेळीने असे न केल्यास स्वच्छ, रखरखीत कापडाने करडाला स्वच्छ करावे.करडाच्या नाका-तोंडातील चिकट स्त्राव काढावा. जेणेकरून करडाना श्वास घेण सोपे जाईल. मुख्य म्हणजे शेळीने करडाला(Goat kid) चाटले तरच ती त्याला ओळखते. नाहीतर ती करडाला स्वतःचे दूध पिऊ देत नाही.

करडू निरोगी राहून चांगली वजनवाढ मिळण्यासाठी करडाचे योग्य संगोपन महत्त्वाचे असते. करडाचे व्यवस्थित संगोपन करण्यासाठी वयोगटानुसार करडाचे वर्गीकरण गरजेचे आहे. करडांचे वयोमानानुसार तीन प्रकार येतात-

- जन्मापासून सुरुवातीचे दोन महिने

- २ ते ४महिने

- ४ ते ६ महिने

करडे एका आठवड्याची झाल्यानंतर त्यांच्या शेडमध्ये हिरवा पाला टांगून ठेवावा. असे केल्याने त्यांना हिरवा पाला खाण्याची सवय लागते. हिरवा चारा (Green fodder)खाल्ल्याने करडांच्या पोटाची वाढ लवकर होण्यास मदत होते. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी राहील, याची काळजी घ्यावी. व्यायल्यानंतर करडाची नाळ एक ते दीड इंच लांब अंतरावर निर्जंतुक कात्रीने कापावी. कापलेल्या ठिकाणी टिंक्‍चर आयोडीन लावावे. खुरांवर अतिरिक्त वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा. असे केल्याने, करडांना उभे राहण्यास मदत होईल. जन्मल्यानंतर करडाचे वजन करून घ्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com