goat kid
goat kidAgrowon

पावसाळ्यात करडांची अशी काळजी घ्याल!

करडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य सकस आहार, भरपूर व्यायाम आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

करडांचे (goat kid) आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य सकस आहार, भरपूर व्यायाम आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. करडासाठीचे कप्पे मोकळे, हवेशीर, उबदार आणि कोरडे असणे गरजेचं आहे.

करडांच्या वाढीचे साधारणपणे तीन टप्पे असतात. जन्मापासूनचे सुरुवातीचे दोन महिने, दोन ते चार महिने आणि चार ते सहा महिने, अशा पद्धतीने करडांच्या व्यवस्थापनात बदल करणे सोयीचे जाते. करडांच्या कप्प्यातील तापमान वाढीसाठी पोषक असल्यास, करडे बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी उर्जा खर्च करत नाही.

goat kid
जाणून घ्या, शेळी निवडीचे निकष

करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यास, करडांंच्या मरतुकीचे प्रमाण वाढते. करडांच्या योग्य वाढीसाठी योग्य तापमान गरजेचं आहे. बाहेरील वातावरण अति थंड असल्यास करडाच्या कप्प्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत दिव्यांचा वापर करावा. वातावरणात आद्रॆतेच प्रमाण जास्त असल्याने, ओलसर कप्पा कोरडा होण्यास वेळ लागतो.

goat kid
ही शेळी दिसते हरणासारखी

पावसाळ्याच्या काळात करडे कोरड्या ठिकाणीच राहतील याची विशेष काळजी घ्यावी. कप्प्यातील आद्रॆता कमी करण्यासाठी चुनखडीचा वापर करावा. कोणत्याही ऋतूत करडांना स्वच्छ, निर्जंतुक पाणी मिळेल अशी सोय करावी.

पावसाळा सुरु होताच करडांना प्रतिजैविकांच्या आणि जीवनसत्त्वाच्या गोळ्या सुरु कराव्यात. करडांमध्ये माती चाटणे, परोपजीवीचा प्रादुर्भाव यांसारख्या समस्या दिसून येतात. वाढीच्या अवस्थेत असलेल्या करडाच्या शरीरात क्षारांची कमतरता झाल्यास ते माती चाटू लागतात. करडाचा जन्म झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांना पहिला जंतनाशकाचा डोस द्यावा. पुढे दर महिन्याला त्यांचे जंतनिर्मुलन करावे. वाढत्या वयानुसार कप्प्याचे आकारमान वाढवावे. जेणेकरून कप्प्यातील हवा खेळती राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com