शेळीच्या पिल्लांचे संगोपन कसे कराल?

शेळी पालन व्यवसायातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, त्यांच्या निरोगी वाढीवर ठरत असते.
शेळीच्या पिल्लांचे संगोपन कसे कराल?
goat kid management Agrowon

शेळी पालन व्यवसायातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, त्यांच्या निरोगी वाढीवर ठरत असते. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या तोंडावरील पातळ द्रव्याचा पडदा पुसून घ्यावा. असे केल्याने करडाची श्वसनक्रिया सुरळीत सुरु होईल.

शेळी व्यायल्यानंतर (kidding) करडांना चाटून स्वच्छ व कोरडे केल्याची खात्री करून घ्यावी. व्याल्यानंतर शेळीने करडाला न चाटल्यास स्वच्छ, कोरड्या कापडाने करडांना कोरडे करून घ्यावे. करडाची नाळ अडीच सेंटीमीटर अंतरावर कापून घ्यावी. आयोडीनमध्ये (Iodine) बुडवून घ्यावी. शेळी व्यायल्यानंतर किमान ७२ तास करडांना शेळीसोबत ठेवावे.

goat kid management
जाणून घ्या, शेळी निवडीचे निकष

करडांचा जन्म झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासांमध्ये करडांना जास्तीत जास्त चिक मिळेल, अशी व्यवस्था करावी. जन्मानंतर पहिल्या एक तासामध्ये कमीत कमी १०० मिली चिक प्रत्येक करडाच्या पोटात गेला पाहिजे. विण्याच्या ७२ तासानंतर शेळी व करडू दिवसभर वेगळे ठेवून, रात्रभर एकत्र ठेवावे. दिवसातून २ ते ३ वेळेस दूध पिण्यासाठी काही वेळ एकत्र ठेवावे.

अशक्त करडांना ४० वॅट विजेच्या दिव्याखाली रखरखीत कापडामध्ये किंवा पोत्यामध्ये गुंडाळून उबदार ठेवावे. करडाच्या वयाच्या पंधराव्या दिवसांपासून त्यांना ताजे, कोवळे, लुसलुशीत गवत खाण्यास द्यावे. व्यायलेल्या शेळीला जास्त चिक असल्यास तो गोठवून ठेवू शकता. चिक नसलेल्या शेळीच्या करडांना पाजण्यास हा चिक वापरू शकता. रात्रीच्या वेळी करडांना स्वच्छ, कोरड्या निवाऱ्याच्या जागी ठेवावे.

goat kid management
संगमनेरी शेळी दुधासाठीही उपयुक्त

एक महिना पूर्ण झाल्यानंतर करडाना जंतनाशकाचे औषध देणे सुरु करावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार तीन महिन्याच्या पुढील करडांचे लसीकरण करून घ्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.