Goat Farming : तृतीयपंथीयांना श्रीरामपुरात शेळीपालनाचे प्रशिक्षण

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगर येथील समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

नगर ः तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगर येथील समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे (Goat Farming) प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामपूर येथून करण्यात आली. हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे‌. (Goat Rearing Training to Transgender)

Goat Farming
अपंगत्वावर मात करीत यशस्वी शेळी-मेंढीपालन

सामाजिक न्याय विभागाच्या नगर येथील सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने जनशिक्षण संस्थानच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येथील तृतीयपंथीय समाज आश्रमात २३ जुलैपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूरजहाँ शेख होत्या. समाजकल्याण विभाग, जिल्हा कौशल्यविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून व्यक्तींसाठी तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने http://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. तेथे नोंदणी केल्यानंतर तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते.

Goat Farming
शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

राज्य सरकारनेही तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजना व उपक्रमांचा लाभ देण्यात येतो, यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तृतीयपंथीयांना माहिती दिली. यातून नक्कीच तृतीयपंथी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करू शकतील. समाजकल्याण विभागानेही त्यांना लागणाऱ्या सुविधा मिळवून देण्यासाठीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या वेळी सामाजिक कार्यकर्त्या दिशा शेख यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com