चराईपास, शस्त्र वापरण्याची मेंढपाळांना परवानगी द्या

मेंढ्यांसाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून त्यासाठी तत्काळ पासेस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेने केली.
Shepherd
ShepherdAgrowon

बुलडाणा : मेंढ्यांसाठी चराई क्षेत्र (Grazing Field For Sheep) उपलब्ध करून त्यासाठी तत्काळ पासेस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेने केली. तसेच, मेंढपाळांवर (Shepherd) होणारे हल्ले पाहता आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची परवानगीसुद्धा मागण्यात आली आहे.

Shepherd
Animal Care: जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा

मेंढपाळ व धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी नवयुवक सेनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडोच्या संख्येने धनगर, मेंढपाळ मेंढ्यासह सहभागी झाले. यानंतर जिल्हधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Shepherd
Animal Care : जनावरांतील विषबाधेची कारणे कोणती आहेत?

त्यात धनगर समाजाला चराई क्षेत्र उपलब्ध करून समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय वाचावा म्हणून चराई पासेस दिले जावेत. धनगरांची भटकंती सुरू असते. यामध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात. यामधून स्वतः जीव वाचविण्यासाठी पिस्तुलाचा परवाना दिला जावा. धनगर, मेंढपाळांविरुद्ध दाखल खोटे गुन्हे तत्काळ रद्द करावे, पशुवैद्यकीय सेवा व पशुआरोग्य सेवा पुरविणे, लाभार्थ्यांना शेळ्यांचे गट, महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, धनगर व मेंढपाळांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, असेही म्हटले.

जिल्ह्यात गिरोली, पिंपळगावनाथ, गारपेठ, कोडगाव, नांद्री, इसलवाडी, धामणगाव देशमुख, तारापूर, वरुली सहस्रमुळी, निमखेड, शेंद्री, काळेगाव, हिवरा, कुंबेफळ लगतचे अभयारण्य चराईसाठी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com