कालवड संगोपन करावे का?

आपल्या गोठ्यात मादी वासराचा जन्म झाल्यापासून तिचं रुपांतर गायीमध्ये होण्यासाठी अंदाजे दोन-अडीच वर्षाचा कालावधी लागतो.
कालवड संगोपन करावे का?
heifer management Agrowon

आपल्या गोठ्यात मादी वासराचा (female calf) जन्म झाल्यापासून तिचं रुपांतर गायीमध्ये होण्यासाठी अंदाजे दोन-अडीच वर्षाचा कालावधी लागतो. या दोन वर्षात ६० ते ६५ हजारांचा खर्च येत असतो. व्यवस्थापनातील काही चुकीच्या बदलामुळे संगोपन खर्चात वाढ होत असते. कालवड (heifer) गाभण राहण्याचा कालावधी वाढल्यास खर्चात अतिरिक्त वाढ होत असते. कारण कालवड गाभण राहून विक्रीस योग्य किंवा वासराला (calf) जन्म देईपर्यंत तिच्यापासून कोणतेही उत्पादन मिळत नाही.

कालवड वयात येऊन गाभण राहीपर्यंत तिच्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पादन मिळत नाही. म्हणून कालवड संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज पडते. कालवडीची आनुवंशिकता म्हणजे तिचे जनुकीय गुणधर्म माहित नसणे. कालवड संगोपनाची शास्त्रीय माहिती नसल्यास नुकसान होऊ शकते.

heifer management
कालवड संगोपनात वजनवाढ महत्त्वाची! । Kalvad Sangopan । Heifer Rearing

सुरुवातीला तर कोणताही व्यवसाय करताना त्यामागचा पशुपालकांचा हेतू स्पष्ट असायला हवा. म्हणजे असं की पशुपालन दूध उत्पादनासाठी करायचं, की, कालवड संगोपनासाठी करायचं. मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट सारखी आहे ती अशी की जास्त दूध उत्पादन असो की कालवड संगोपन असो, तुमच्याकडे उच्च वंशावळीची चांगल्या आनुवंशिकतेची जनावरे असलीच पाहिजेत.

heifer management
कालवड संगोपन का महत्त्वाचं?

वंशावळ माहित असल्यास भविष्यातील दूध उत्पादनाचा अंदाज पशुपालक घेऊ शकतात. यापलीकडे जाऊन आपल्या गोठ्यात किती क्षमतेची कालवड तयार होईल, याचीही माहिती असते. असे केल्याने पशुपालकांचा अवाजवी खर्च वाचेल. व्यावसायिकदृष्ट्या कालवड संगोपन करताना तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शास्त्रीय नियोजन केलं पाहिजे.

कोणताही व्यवसाय करण्याआधी आहार, निवारा आणि इतर व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन पशुपालकांनी केलं पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com