कालवड संगोपन का महत्त्वाचं?

दुग्धव्यवसायात दुधाबरोबरच कालवड संगोपणातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते, यासाठी कालवड लवकर मोठी होऊन गाभण राहिली पाहिजे.
Heifer rearing is of atmost important in dairy farming.
Heifer rearing is of atmost important in dairy farming.

आपल्याकडे पशुपालन करत असताना कालवड संगोपनाबाबत (heifer rearing) पशुपालक (dairy farmer) जागरूक होताना दिसतायेत. पण हे संगोपन करत असताना काही ठिकाणी मादी वासराची वयानुसार योग्य वजनवाढ होताना दिसत नाही. तर काही ठिकाणी अतिरिक्त वजनवाढ होऊन कालवडी (heifer) माजाची लक्षणेही (heat symptoms) दाखवायला लागतात.

कालवडीच्या संगोपनात आहार व्यवस्थापनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पशुपालकांनी कालवडीच्या आहार व्यवस्थापनाचा उद्देश हा नेहमी फक्त जोमाने, अधिक गतीने कालवडीचे वजन वाढ व्हावी हाच ठेवला आहे. खरेतर कालवड संगोपनाचा उद्देश हा कालवडीचे वजन वाढवतानाच शारीरिक विकास होऊन योग्य वेळेत, कमी खर्चात, भविष्यात अधिक दूध देणारी गाय तयार करणे हा असला पाहिजे. कालवड संगोपन करताना कालवडीचे वयाबरोबर किती वजन वाढावे, शारीरिक विकास मुख्यत्वे कासेचा विकास, कालवड वयात येणे, कृत्रिम रेतन करण्याचे वय आणि वजन, कालवड पहिल्यांदा विण्याचे वय आणि वितानाचे वजन या बाबींचा विचार केला पाहिजे.

- कालवडीचे वजन करीत असताना फक्त शारीरिक वजन वाढल्याचे दिसून येते.


- कालवडीच्या शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण नैसर्गिकरीत्या नियंत्रित केले जाते. पोटात असणारा चारा किंवा कालवडीने चारा खाल्ल्यानंतर लगेचच जरी वजन केले तरी हा चारा वजनात दिसून येत नाही.


- कालवडीची खरी शारीरिक वाढ ही प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाची शरीरात साठवणूक झाल्याने होत असते.

- कालवडीचे वय लहान असताना, शरीरात प्रथिनांची साठवणूक जास्त प्रमाणात होत असते.

- सुरुवातीच्या अवस्थेत शरीरात प्रथिने साठवणुकीचा वेग जास्त असतो.

- कालवडीचे वय जसे-जसे वाढत जाते. तस-तशी प्रथिने साठवणुकीचा वेग मंदावतो. आणि चरबी साठवणुकीचा वेग वाढतो.

- ही वाढ जास्त प्रमाणात झाल्यास शरीरात अतिरिक्त चरबी साठली जाते.


ही कालवड जेव्हा पहिल्यांदा वयात आल्यावर दर २१ दिवसांनी माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करते. साधारणतः कालवडीचे वजन २५० ते ३०० किलोच्या आसपास झाल्यावर माजावर येते. पहिल्यांदा माजावर येण्याचं वय हे गायीच्या विविध जातीनुसार बदलत असते. काही वेळेस आहार व्यवस्थापनावरही या गोष्टी अवलंबून असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com