
पावसाळ्यात (Rainy Season) वातावरणातील ओलावा वाढल्याने, जनावरांना इतर संसर्गजन्य आजारांबरोबर खुरांचे आजारही होत असतात. पावसाळ्यात खुरांमधील संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असते. या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर (milk production) झालेला दिसून येतो. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात. पावसाळ्यात खुरे सतत ओली राहिल्याने ती मऊ पडतात. जनावरे चरायला जाताना मऊ खुरांमध्ये जखम होण्याची शक्यता वाढते.
उपाययोजना-
- पावसाळ्यात जनावरांची खुरे जास्त काळ ओली राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.
- गोठ्यातील जनावरांचे मल-मूत्र वेळच्या वेळी साफ केले पाहिजे. पाण्याने गोठा साफ करताना गोठ्यात पाणी साचून राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
- गोठ्यामध्ये जनावरे बसण्या-उठण्याच्या जागी कोरड्या चाऱ्याचे किंवा भूश्श्याचे जाड बेडिंग मटेरिअल (bedding material) तयार करावे. असे केल्याने जनावरांच्या खुरांचा मल-मुत्राशी डायरेक्ट संबंध येणार नाही.
गोठ्याच्या स्वच्छतेबरोबर खुरांची (hooves) स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासाठी पावसाळ्यात खुरांचे आजार टाळण्यासाठी फुट बथिंग (foot bath) करणे गरजेचं आहे. फुट बथिंगसाठी पाण्यात जंतुनाशक औषध टाकावे. जंतुनाशकांची फवारणी गोठ्यात वेळोवेळी करावी.
आठवड्यातून किमान एकदा १ लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम परमॅग्नेटचे (Potassium Permagnet) द्रावण बनवून त्यात जनावरांचे पाय किमान ३० मिनिटे बुडवावेत.
खुरांच्या आरोग्याची काळजी घेताना खुरांची अतिरिक्त वाढ न होऊ देणं, देखील महत्त्वाचं आहे. यासाठी अतिरिक्त वाढ झालेली खुरे वेळोवेळी कापली पाहिजेत. खुरांची अतिरिक्त वाढ झाल्यास जनावरांना शरीराचे वजन, दोन पायांवर पेलणे अवघड जाते.
एखादे जनावर लंगडत असल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.