
शहादा, जि. नंदुरबार : सारंगखेडा (ता. शहादा) येथील यात्रेनिमित्त सुरू असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये (Chetak Festival) अश्व मैदानावरील ट्रॅकवर अश्वशर्यती (Horse Racing) घेण्यात आल्या. त्यात व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग अशा दोन गटात स्पर्धा झाल्या.
त्यात ३६ घोड्यांचा सहभाग होता. शेतकरी गटातून प्रथम क्रमांक बाबूलाल अश्व, तर व्यापारी गटातून उत्तर प्रदेशाच्या गौसखान यांचा मलंग घोड्याने पटकावला. या शर्यती पाहून हजारो अश्वशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
चेतक फेस्टिव्हल अंतर्गत आज घोड्यांच्या धावण्याची स्पर्धा झाली. यात एकूण ३६ घोड्यांचा सहभाग होता. सहा राउंडमध्ये पाच- पाच घोड्यांना तीन राउंडनुसार दौडविण्यात आले. त्यातून एक एक असे अंतिम राउंडमध्ये पाचमधून तीन विजेते काढून त्यांना गौरविण्यात आले. अत्यंत चित्तथरारक दौड पाचही राउंडमध्ये झाली. घोड्यांची दौड पाहून उपस्थित अश्वप्रेमीच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मुंबई- दिल्लीच्या धर्तीवर ही स्पर्धा झाली.
विजेत्यांचा जल्लोष
विजेत्या अश्वमालकांनी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या घोड्यांवर पाचशे रुपयांचा नोटा उडवीत विजयाचा आनंद साजरा केला. ढोल- ताशांच्या गजरासह नृत्य करीत गुलालाची उधळण केली. विजयानंतर अश्वमालकांनी सुमारे तासभर तल्लीन होऊ नाचत आनंदोत्सव साजरा केला.
विजेत्या स्पर्धकांना चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सरपंच, पृथ्वीराजसिंह रावल, दिग्विजयसिंह रावल, प्रणवराजसिंह रावल आदी मान्यवर उपस्थित होते. आरिफ शहा व पुरुषोत्तम आगळे यांनी सूत्रसंचालन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.