बायपास फॅट म्हणजे काय?

बायपास फॅट जनावरांच्या पहिल्या तीन पोटामध्ये न पचता शेवटच्या पोटामध्ये पचवून पोषक तत्वे शोषली जातात.
bypass fat
bypass fatAgrowon

रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट चार कप्प्यांमध्ये विभागलेले असते. यामध्ये कोठीपोट, जाळीपोट, पडदे पोट, खरे पोट हे चार भाग येतात. सर्वसाधारणपणे जनावरांनी कोणत्याही प्रकारचे खाद्य खाल्ल्यानंतर ते रुमेनमध्ये जाऊन बसते. जनावर विश्रांती करत असताना हे खाल्लेलं अन्न तोंडात घेऊन त्याचे चर्वण केले जाते. याच प्रक्रियेला रवंथ असे म्हटले जाते.

bypass fat
लाल कंधारीचे दूध उत्पादन | Milk producing ability of Lal Kandhari Cow | ॲग्रोवन | Part-3

बायपास फॅट जनावरांच्या पहिल्या तीन पोटामध्ये न पचता शेवटच्या पोटामध्ये पचवून पोषक तत्वे शोषली जातात. बायपास फॅटचे पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते. परिणामी दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. दूध उत्पादन, प्रजननासाठी लागणारी उर्जा बायपास फॅट द्वारे दुभत्या जनावरांना उपलब्ध होते.

बायपास फॅट कसे कार्य करते?
गायी-म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा यांसारख्या घटकांचे पचन करण्याचे काम कोठीपोटात लाखोंच्या संख्येने असलेले सूक्ष्म जीवाणू करत असतात.

bypass fat
दुधातील भेसळीचे प्रकार | Milk Adulteration | ॲग्रोवन

त्यामुळे चांगल्या प्रकारची प्रथिने, स्निग्ध पदार्थ जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीं म्हशींना लगेचच उपलब्ध होत नाहीत, म्हणूनच बायपास फॅटचे संतुलित पशु आहारात महत्व जास्त आहे. कारण ते थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते.

bypass fat
स्वच्छ दूध उत्पादनाची सूत्रे | Clean Milk Production | ॲग्रोवन

बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील उर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन योग्य वाढ होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात. दुधाळ गायी-म्हशी चांगल्या दुधाचे उत्पादन देऊ शकतात.

बायपास फॅट तंत्रज्ञान दुभत्या गायी व म्हशींसाठी वरदान असून त्याचा उपयोग पशुपालकांनी केल्यास दूध व्यवसायातील अडचणी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com