या कारणांमुळे म्हशीची रेडके दगावतात

रेड्काचा जन्म झाल्यापासून १० ते १५ दिवसात त्यांना जंताचा प्रादुर्भाव होत असतो. योग्य व्यवस्थापन केल्यास, रेड्काच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
Buffalo Calf
Buffalo CalfAgrowon

आपल्याकडील सरासरी ५० टक्के रेड्कांचा (Buffalo calf) मृत्यु होत असतो. रेडकांचे बहुतांश मृत्यु हे त्यांचे वय सहा महिने असतानाच होत असतो. म्हशींमध्ये मुका माज (silent heat) दाखविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यातच म्हशींच्या रेडकाचा मृत्यू झाल्यास, काही वेळेस म्हशी पान्हा सोडत नाहीत. म्हशीच्या रेडकाचा मृत्यु होण्यामागे अनेक कारणे आहेत,

जंत प्रादुर्भाव (worm infestation) –रेड्काचा जन्म झाल्यापासून १० ते १५ दिवसात त्यांना जंताचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे जन्मानंतर दहाव्या दिवशी रेडकाला जंताचे औषध न दिल्यास जंत प्रादुर्भावाची शक्यता वाढते.

Buffalo Calf
जाणून घेऊया पूर्णाथडी म्हशींची वैशिष्ट्ये | Characteristics Of Purnathadi Buffalo | ॲग्रोवन

रोगप्रतिकार शक्ती- जन्मतः रेडकाची कमी असलेली रोगप्रतिकारशक्ती विविध आजारास कारणीभूत ठरते. जन्मानंतर त्याला योग्य प्रमाणात चिक न मिळाल्यास, काहीवेळेस पाहिलारू रेडकू असल्यास, दूध काढू देत नाहीत किंवा वासरालाही दूध पिऊ देत नाहीत. रेड्काच्या वजनानुसार १५ टक्के चिक २४ तासात दोन ते तीन वेळा विभागून पाजावा.

Buffalo Calf
उष्ण वातावरणात टिकून राहणारी म्हैस | Purnathadi Buffalo | ॲग्रोवन

शरीरातील जीवनसत्त्वाची कमतरता- जीवनसत्त्व 'अ'च्या कमतरतेमुळे रेडकाची वाढ खुंटते. त्वचा रोग होऊन, ती निस्तेज दिसू लागते. यासाठी रेडकांना महिन्यातून पाच दिवस जीवनसत्त्वाची टॉनिक दिली पाहिजे.

बदलत्या वातावरणाचा परिणाम - बदलत्या वातावरणाचा देखील रेड्कांच्या वाढीवर परिणाम होत असतो. निवाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून, बदलत्या वातावरणापासून रेडकांचे संरक्षण करू शकता.

नाळेचे आजार- काहीवेळेस रेड्काचा जन्म झाल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यास रेड्काच्या नाळेला संसर्ग होतो. नाळेला सूज येते. यासाठी नाळ शरीरापासून दोन ते अडीच इंचावर कापून घ्यावी, त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com