Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांच्या पिलांची निवड कशी करावी ?

पिलांची खरेदी ही उच्च दर्जाच्या अंडी उबवणूक केंद्रातून करावी. चांगल्या व उच्च दर्जाच्या पिलांच्या निवडीवर नफा हा अवलंबून असतो.
 Management Of Broiler Poultry
Management Of Broiler Poultry Agrowon

ब्रॉयलर कोंबड्यांची (Broiler Poultry) वाढ ही अतिशय वेगाने होत असते. या कोंबड्या केवळ ५ ते ६ (३५ ते ४२ दिवसांत) आठवड्यात विक्रीस तयार होतात. त्यामुळे कमी कालावधीत कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन करणे (Management Of Broiler Poultry) अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ब्रॉयलर पिलांची निवड करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनूसार पिलांची निवड करताना पुढील बाबींचा विचार करावा.

 Management Of Broiler Poultry
Poultry : ब्रॉयलर पक्षी संगोपनातून अर्थकारणाला गती

पिलांची निवड कशी करावी?

पिलांची खरेदी ही उच्च दर्जाच्या अंडी उबवणूक केंद्रातून करावी. चांगल्या व उच्च दर्जाच्या पिलांच्या निवडीवर नफा हा अवलंबून असतो.

पिलांची निवड करण्यापूर्वी सदरील अंडी उबवणूक केंद्रास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा तेथील केंद्राबद्दल माहिती घ्यावी. त्यानंतरच खरेदी करावी.

सद्यःस्थितीत भारतीय बाजारात कॉब-४३० वाय, रॉस-३०८-एपी९५, इंडियन रिव्हर, अरबोर एकर्स, हबर्ड, लोहमन, स्टार ब्रो इत्यादी जाती उपलब्ध आहेत.

 Management Of Broiler Poultry
व्यवस्थापन ब्रॉयलर कोंबड्यांचे !

पिलांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक गुणधर्म कोणते?

पिलांची वाढ जलद होणारी असावी. पिले उत्तम रोग-प्रतिकारक क्षमता असलेली असावीत.

स्नायू मांसल व पुष्ट असावेत. खाद्याचे मांसात जास्त व लवकर रूपांतर करण्याची क्षमता असावी.

मरतुकीचे प्रमाण कमी असावे.

पिलांसाठी जागा

पिलांना त्यांच्या वयोमानानुसार जागा पुरवणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी पारंपरिक गादी पद्धतीत त्यांना खालील प्रमाणे जागा द्यावी.

१ आठवडा : ०.३ चौ. फूट

२ आठवडा : ०.४ चौ. फूट

३ आठवडा : ०.५ चौ. फूट

४ आठवडा : १.० चौ. फूट

५ ते ६ आठवडा : १.२ चौ. फूट

कमी जागा किंवा अधिकची जागा दिल्यास पिलांच्या वाढीवर परिणाम होतो. योग्य प्रमाणात जागा दिल्यास कोंबड्यांची वाढ योग्य त्या प्रमाणात होते. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते. जागेमध्ये ऋतुमानानुसार बदल करावाच लागतो, नाहीतर विविध रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, उन्हाळ्यामध्ये १० ते १५ टक्के जागा जास्त द्यावी लागते. त्यामुळे त्यांचा उष्माघातामुळे बचाव होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com