जनावरांचा गोठा बांधताना या गोष्टी लक्षात ठेवा!

फार पूर्वीपासून पशुपालन आपल्याकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून केला जातोय. सध्या तो मुख्य व्यवसायाचे रूप घेऊ लागला आहे. पशुपालन व्यवसाय जरी वंश परंपरागत व्यवसाय असला तरी, काळानुसार त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत.
Dairy Shed construction
Dairy Shed construction Agrowon

शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या या क्षेत्राकडे लोक व्यवसाय म्हणून बघू लागलेत. व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास पशुपालनात आहार (feed) आणि गोठा (shed) व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

जनावरांच्या गोठ्याचे प्रकार, त्याचे आकारमान शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे, स्थानिक परिस्थितीनुसार बदलत असते. सर्वात पहिले तर जनावरांचा गोठा मोकळा आणि कोरडा (dry) असला पाहिजे. गोठा नेहमी काहीशा उंचीवरच्या सपाट जमिनीवर असला पाहिजे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल. गोठा मुरमाड, पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीत असल्यास जनावरांच्या मलमुत्राचीही योग्य विल्हेवाट लावता येईल.

Dairy Shed construction
जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं !

गोठ्यात जनावरांचे मुत्र साचू नये म्हणून, जमिनीला एक टक्क्यापर्यंत उतार द्यावा. गोठा वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी त्याठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले पाहिजे. गोठा धुतल्यानंतर एका टक्का फिनाईलचे द्रावण फवारावे. असे केल्याने गोठ्यातील गोमाशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Dairy Shed construction
खरिपात करा या चारापिकांची लागवड

गोठा बांधताना गोठ्यात भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश (sunrays) येईल याची काळजी घ्यावी. गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी. सूर्यप्रकाशामुळे गोठा कोरडा राहण्यास मदत होईल. सोबतच हवा खेळती राहिल्याने गोठ्यात अमोनिया (ammonia) वायु साचून राहणार नाही. गोठयापासून शेण टाकण्याची किंवा साचवून ठेवण्याची जागा ६० फूट अंतरावर असावी.

सुरवातीला बंदिस्त गोठ्यात, तोंडाकडे तोंड किंवा शेपटाकडे शेपूट या पद्धतीचे जनावरांचे गोठे बांधले जात. काही ठिकाणी घराच्या आडोशालाच पडवीला जनावरे बांधली जातात. सध्या मुक्त संचार पद्धत पशुपालकांच्या जास्त पसंतीस पडलेली दिसून येते. कारण या पद्धतीमध्ये जनावरांच्या व्यवस्थापनावरील अतिरिक्त खर्च टाळता येतो. जनावरे निरोगी राहिल्याने औषध उपचारावरील खर्च देखील कमी होतो.

जनावरांच्या गोठ्याचा मुख्य उद्देश त्यांचे ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण करणे होय. तसेच गोठ्यात त्यांना आरामदायी वातावरण मिळणेही तितकेच गरजेचं आहे. त्यामुळे दूध उत्पादनातील सातत्य टिकून राहण्यास मदत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com