
मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे (Reproductive system) आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत.
त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते. गाईच्या जननेंद्रियाचे आजार आणि त्यांची लक्षणे काय आहेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
१) गर्भाशयाचा दाह
गर्भाशयातून पू येणे त्याचा कुजट वास येणे. गर्भाशय मोठे व मऊ होणे. वार पूर्णपणे न पडणे व गाय वारंवार उलटणे.
२) इन्फेक्शीयस बोवाईन रिनोट्रायकीयासीस
एकाकी ताप चढणे, नाकातून चिकट स्त्राव येणे, ढासने, योनीमार्गात पूवाच्या गाठी तयार होणे. डोळे लाल होणे. गर्भपात होणे. वारंवार उलटणे.
३) व्हीब्रीओसीस
चार ते पाच महिन्याचा गर्भपात होणे. वारंवार उलटणे, गाभ उशिरा धरणे. माज न दाखविणे.
४) लेप्टोस्पायरोसीस
एकाएकी ताप चढणे. भूक मंदावणे. कोणत्याही कालावधीत गर्भपात होणे. तांबडी लघवी होणे. अशक्तपणा जाणवणे. चिकट दूध येणे.
५) ब्रुसोलोसीस
६ ते ७ महिन्याचा गर्भपात होणे. वार व्यवस्थित न पडणे, वारंवार उलटणे, गर्भाशयाचा दाह वाढणे.
६) ट्रायकोमोनीओसीस
२ ते ३ महिन्याचा गर्भपात होणे, गर्भाशयाचा दाह होऊ पु तयार होणे. अनियमित माज दाखविणे, वारंवार उलटणे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.