हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय?

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये मातीचा वापर न करता फक्त पाण्याचा वापर करून चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते.
hydroponic fodder system
hydroponic fodder systemAgrowon

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा (Hydroponic) वापर करून फक्त पाण्यावरच चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते. फक्त पाण्यावरती वाढून सात ते आठ दिवसात तयार होणारा हिरवा चारा म्हणजे हायड्रोपोनिक चारा होय. यामध्ये मका (maize), गहू (wheat), बार्ली (Barley) यांसारख्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये नियंत्रित वातावरणात फक्त पाण्यावरच चांगल्या चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये बियाणे उगवण्यासाठी, त्यांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी तापमान नियंत्रित ठेवले जाते. आर्द्रता आणि तापमान नियंत्रित ठेवल्यास चांगल्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.

हायड्रोपोनिकमध्ये चांगल्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी ८५ टक्क्याच्या वर उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निवड करावी. ३० बाय ४० सेंटीमीटर आकाराच्या बाजारात सहज उपलब्ध असलेल्या प्लॉस्टिक ट्रेचा वापर करावा. पाण्यावरच चाऱ्याचे उत्पादन घेत असल्याने जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी ट्रेला योग्य प्रमाणात छिद्रे पाडावीत.

पाण्याच्या पाळ्या ठरविक वेळेनंतर द्याव्या लागत असल्याने, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा बाजारात उपलब्ध आहे. आपल्याकडील जनावरांची एकूण संख्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक संचाचे आकारमान ठरवावे.

हायड्रोपोनिकमध्ये चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असले पाहिजे. आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यापर्यंत असले पाहिजे. पावसाळ्यात तापमान नियंत्रित करण्यावर काही मर्यादा येतात. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने बियाण्याला किंवा चाऱ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते.

हायड्रोपोनिकमध्ये चाऱ्याचे उत्पादन घेताना प्रामुख्याने ॲस्परजीलस बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची संभावना असते. पावसाळ्यात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही जास्त असते. यासाठी चाऱ्यासाठी बियाण्यांची निवड करताना ते रोगविरहित असल्याची खात्री करून घ्यावी. उगवणक्षमता कमी असलेल्या किंवा कीड लागलेल्या बियाण्याचा वापर करू नये. सुरुवातीला अशा कीड लागलेल्या बियाण्यांना बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होऊन, तो पसरत जातो.

hydroponic fodder system
जनावरांसाठी ज्वारीचा चारा !

वापरायचे बियाणे मिठाच्या द्रावणात टाकून वर तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले बियाणे नंतर एक टक्का पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणामध्ये १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे. हे बियाणे चारा निर्मितीसाठी वापरावे.

hydroponic fodder system
जनावरांना द्या विविध प्रकारचा पौष्टिक चारा

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चाऱ्याचे उत्पादन घेताना, प्रामुख्याने शेडनेटमध्ये ही यंत्रणा बसविली जाते. पावसाळ्यात पाणी झिरपण्याची शक्यता असल्याने, अतिरिक्त पाण्यामुळे बियाणे कुजण्याची किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात हायड्रोपोनिक चाऱ्याचे उत्पादन घ्यायचे झाल्यास, पाणी आत येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com