पावसाळ्यात जनावरांची खुरे नरम का पडतात?

गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग खुरांच्या आजारास कारणीभूत असतात.
Hooves Management Of Animals
Hooves Management Of AnimalsAgrowon

वातावरणात ऋतुमानानुसार होणारे बदल लक्षात घेऊन, व्यवस्थापनात योग्य बदल न केल्यास दूध उत्पादनात (milk production) फरक दिसून येतो. बदलत्या वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांची बाधा होते. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग खुरांच्या आजारास कारणीभूत असतात.

पावसाळ्यात (rainy season) सर्वत्र झालेला चिखल, या चिखलातून जनावरांना चरायला नेल्याने, तसेच गोठ्यात सततचा असणारा ओलावा खुरांना संसर्ग होण्यास कारणीभूत असतो. पावसाळ्यात जनावरांची खुरे नरम पडल्याचे प्रकार आपण पाहतो. काही वेळेस जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती खुरांच्या आजारास (hooves disease) कारणीभूत असते. पावसाळ्यात खरिपातील (Kharif) शेतीकामांची लगबग देखील सुरु झाल्याने, बैल शेतीकामांसाठी निरोपयोगी ठरतात.

Hooves Management Of Animals
जातिवंत गवळाऊ वळुंची माहिती | Goalao pure bull for breeding | Part-7 | ॲग्रोवन

बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्तसंचार गोठ्यात (Loose Housing System) जनावरांची खुरे नरम पडण्याचे प्रमाण जास्त असते. जनावरे शेणात आणि मूत्रात जास्त वेळ उभी राहिल्यास खुरे नरम पडतात. नरम पडलेली खुरे आजारास कारणीभूत ठरतात. नरम खुरांमध्ये व्रण तयार होतात. खुरांमध्ये गळू यायला लागतो. पुढे जाऊन खुरांच्या आतील भागातील लॅमिना (Lamina) या नाजूक भागाचा दाह होतो. खुरांचा दाह झाल्याने जनावरांना अचानक उठायला व बसायला त्रास होतो. खुरांचा दाह होत असल्याने पाय जमिनीवर टेकवत नाहीत. जनावरांना ताप येतो. श्वासाची गती वाढते. खुरांचा होणारा दाह पशुपालकांच्या वेळीच लक्षात न आल्यास खुरांना संसर्ग सुरु होतो.

Hooves Management Of Animals
जनावरे बसण्याची जागा कशी असावी? | cow seating arrangement in shed | ॲग्रोवन

नरम पडलेल्या खुरांना लवकर भेगा पडतात. भेगांमध्ये जीवाणू संसर्ग होऊन खुरांचा दाह सुरु होतो. खुरांना संसर्ग झाल्याने, त्यातून सडल्यासारखा वास यायला लागतो. सुरुवातीला खुरांना तडा जाऊन जखमेतून ‘पू’ यायला लागतो. वेळेत उपचार न झाल्यास संसर्ग संध्यापर्यंत पोहोचतो.

Hooves Management Of Animals
शेती कामांसाठी बैल जोडीची निवड कशी करावी?

जनावरांची खुरे वर्षातून एकदा, पावसाळ्याआधी योग्य प्रकारे तपासून घ्यावीत. खुरांची कमी जास्त वाढ झाल्याने, जनावरांना त्यांचे वजन सर्व पायांवर संतुलितपणे पेलणे अवघड जाते. जनावरांवर शारीरिक ताण आल्याने, खुरांच्या आजारास लवकर बळी पडतात. तुमचा गोठा मुक्त संचार पद्धतीचा असल्यास त्यातील आधीचा थर काढून, पावसाळ्याआधी नवीन मुरूम पसरवून घ्यावा. जनावरे उभी राहण्याची जागा चिखलमुक्त आणि कोरडी ठेवावी. बंदिस्त गोठा असल्यास जनावरांना स्वच्छ आणि कोरड्या जागी बांधावे. जनावर लंगडत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com