Animal Care : पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्याल?

ओलसर आणि दमट वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
 Animal Care
Animal CareAgrowon

पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. ओलसर आणि दमट वातावरणामुळे रोगांचा (Animal Diseases) प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांच्या प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. कासदाह, (Mustitis) पोटफुगी यासह अनेक संसर्गजन्य आजार जनावरांना होतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासंदर्भात पुढील उपाययोजना सुचवल्या आहेतः


पावसाचे पाणी गोठ्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्यावी. ताडपत्रीचे पडदे गोठ्याच्या बाजूला लावावेत जेणेकरुन पाऊस आत येणार नाही व गोठा ओलसर होणार नाही.

 Animal Care
जनावरे बसण्याची जागा कशी असावी? | cow seating arrangement in shed | ॲग्रोवन

गोठा कोरडा राहावा याकरिता वाया गेलेला चारा किंवा कुटारात चुण्याची पावडर मिसळून पातळ थर पसरावा. त्यामुळे आर्द्रता कमी होईल. गोठ्यात भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश येईल, याची काळजी घ्यावी.


गोठ्यातील पृष्ठभागावर पडलेले छोटे खड्डे हे मुरूम, रेती अथवा सिमेंटच्या साहाय्याने भरुन घ्यावे.


पावसाळ्यात बाह्य व आंतरपरजिवी जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जसे गोचीड, गोमाशा, डास, चिलटे या किटकांच्या चाव्यामुळे सर्रा, बबेलिओसीस, थायलेरियासिस इ. प्रकारच्या आजाराचा प्रादुर्भाव होतो.


गोठ्यामधील डास, गोचिड, गोमाशा, यांचा नायनाट करण्याकरिता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकांची फवारणी करावी.

 Animal Care
पावसाळ्यात जनावरांना होतात हे आजार

गोठ्याच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यातील मलमुत्राची योग्यपणे विल्हेवाट लावावी. आंतरपरजिवीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी.


पावसाळ्यात दुधाळ जनावरे गोठ्यात असतील तर धार काढण्याआगोदर व धार काढल्यानंतर जनावराची कास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने स्वच्छ करावी. जेणेकरुन गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतूसंसर्ग होऊन जनावरांना कासदाह आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही.


दुभत्या जनावराला दुध काढल्यानंतर अर्धा तास उभे राहू द्यावे. कारण दूध काढल्यावर सडाचे छिद्र अर्धा तास उघडे असतात. दुभते जनावर लगेच बसल्यास सडाच्या छिद्रातून गोठ्यातील जीवजंतूचा शिरकाव होतो आणि कासदाह म्हणजेच दगडी कास हा आजार होऊ शकतो.


जनावरांना पावसाळ्यात होणाऱ्या घटसर्प, एकटांग्या रोगाविरुद्ध लसीकरण करुन घ्यावे. शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार रोगाची ईटी लस टोचून घ्यावी. शेळ्यांना पावसाळ्यात अपचन, पोटफुगी, जुलाब यासारखे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. जनावारांना नदी, ओढा या ठिकाणी चरण्यासाठी सोडू नये. शक्यतो पावसाळ्यात शेळ्यांना ठाणबंदी ठेवावे.

नवीन उगवलेला कोवळा हिरवा चारा जनावरांना खुप जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. हिरव्या व वाळलेला चाऱ्याचे योग्य संतुलन राखावे. उदा. ५०० किलो वजनाच्या दुभत्या गाई, म्हशींसाठी २० ते २२ किलो हिरवा चारा, ५ ते ६ किलो कोरडा चारा आणि ६ ते ७ किलो पशुखाद्य (दुधाच्या प्रमाणात) द्यावे.


पावसाळ्यात जनावरे झाडाखाली बांधू नयेत कारण अतिवृष्टीमुळे किंवा गारपिटीमुळे जनावरांना इजा होऊ शकते.


गोठ्यामधील दुर्गंधीयुक्त वातावरण असू नये याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यातील पृष्ठभाग ओला असल्यास जनावर घसरून पडण्याची शक्यता असते. याकरिता गोठ्यातील जमीन कोरडी ठेवावी.


चारा किंवा खाद्य साठवणूक स्वच्छ व हवेशीर ठिकाणी असावी. चारा साठवणूक असलेले ठिकाण ओले असेल तर पावसाळ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com