पनीर ‘व्हे’ अधिक पोषक!

दुधापासून आपण विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत असतो. यात प्रामुख्याने चक्का, छन्ना, पनीर, रसगुल्ला, श्रीखंड यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.
पनीर ‘व्हे’ अधिक पोषक!
paneer whey recipeAgrowon

दुधापासून आपण विविध दुग्धजन्य पदार्थांची (milk product) निर्मिती करत असतो. यात प्रामुख्याने चक्का, छन्ना, पनीर(Paneer), रसगुल्ला, श्रीखंड (Shrikhand) यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. दुधापासून पदार्थ निर्मिती करत असताना, मुख्य पदार्थ वेगळा केल्यानंतर उरतो तो उपपदार्थ म्हणजेच बायप्रोडक्ट.

गायीचे किंवा म्हशीचे दूध (milk)फाटवून तयार केलेल्या पदार्थांमध्ये ‘व्हे’ (whey) हा बाय प्रोडक्ट उरत असतो. या ‘व्हे’मध्ये दुधातील बहुतांश घटक असल्याने त्याचे पोषणमूल्यही चांगले असते. दुधातील जवळपास ५० टक्के पोषक घटक ‘व्हे’मध्ये येत असतात. त्यामुळे ‘व्हे’चे मूल्यवर्धन करून शीतपेय निर्मिती करणे गरजेचं आहे.

 paneer whey recipe
निर्जंतुक दूध म्हणजे काय?

व्हे मधील विविध घटकांचे प्रमाण

पाणी- ९३.४० %

एकूण घन घटक- ६.६० %

प्रथिने- ०.८५ %.

दुग्ध शर्करा- ४.८० %

खनिज द्रव्ये- ०.६० %

 paneer whey recipe
दूध का खराब होते?

व्हे मध्ये पाण्यात विरघळणारी खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत असताना मोठ्या प्रमाणात ‘व्हे’ मिळत असतो. हा व्हे असाच फेकून न देता. त्याच्यापासून विविध शीतपेयांची निर्मिती केली जाऊ शकते. दुधाची निवळी म्हणजेच व्हे होय.

यासाठी व्हे सर्वप्रथम स्वच्छ सुती मलमली कापडाने गाळून घ्यावे. गाळल्यानंतर मिळणारे लिक़्विडला १५ ते २० मिनिटे उकळवून निर्जंतुक करून घ्यावं. उकळून घेतलेला व्हे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा गळून घ्यावा.

या निर्जंतुक द्रावणाला विरजण लावण्यासाठी लॅक्टोबॅसिलस अॅसिडोफिलस जीवाणू संवर्धक व्हेच्या २ % याप्रमाणात लावावे. विरजण लावल्यानंतर द्रावण ३८ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाला १२ ते १५ तास ठेवल्यावर त्यात आम्लाची निर्मिती होईल. आम्लधर्मी व्हे मध्ये ७ ते ९ टक्के दराने साखर टाकावी. उपलब्ध फळांनुसार त्यात व्हे मिक्स करून शीतपेयांची निर्मिती केली जाते.

तयार शीतपेय २०० किंवा २५० मिली काचेच्या बाटलीमध्ये सीलबंद करून बाटल्या ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला १२ ते १५ मिनिटे ठेवून निर्जंतुक करून घ्याव्यात. हे बाटलीमधील तयार व्हे शीतपेय ४ ते ५ अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे.

अगदी कमी खर्चात व्हे पासून विविध शीतपेयांची निर्मिती होत असते. व्हेमिश्रित शीतपेयांचे सेवन केल्याने, त्यातील पोषक घटकही वाया जात नाहीत. व्हेपासून शीतपेयाबरोबरच व्हे पावडर, लॅक्टोज पावडर यांसारखे मूल्यवर्धित पदार्थ देखील बनवता येतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com