Parasite : परजीवींचा प्रादुर्भाव ओळखा...

पावसाळ्याच्या काळात जनावरांना विविध परजीवींचा प्रादुर्भाव होत असतो. वासराच्या विष्ठेतून आणि त्या विष्ठेच्या भौतिक गुणधर्मावरून तीन प्रकारचे आजार होतात.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. श्रीकांत काळवाघे

पावसाळ्याच्या काळात जनावरांना विविध परजीवींचा प्रादुर्भाव (Outbreaks Of Parasites) होत असतो. वासराच्या विष्ठेतून आणि त्या विष्ठेच्या भौतिक गुणधर्मावरून तीन प्रकारचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने टॉक्सोकॅरा व्हिटुलोरम, रक्ती हगवण (कॉक्सीडीओसिस) (Coccidiosis) आणि क्रिप्टोस्पोरीडीयम (झुनोटिक आजार) यांचा समावेश आहे. (Animal Care)

Animal Care
पावसाळ्यात जनावरांची कोरड्या चाऱ्याची गरज वाढते? | Animal Feed Management | ॲग्रोवन

टॉक्सोक्यारा व्हिटुलोरम

जन्मानंतर लगेचच वासरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा कृमिजन्य आजार आहे. कृमीची लागण वासरांना आईच्या गर्भाशयात असताना होते. जन्मानंतर वयाच्या सातव्या दिवसापासूनच हे कृमी असंख्य संख्येने आतड्यामध्ये तयार होतात. त्यांची लांबी अर्धा फुटापर्यंत असते. यांच्या वेटोळ्यांमुळे आतड्याची संभाव्य हालचाल मंदावते.

लक्षणे

आवमिश्रित हगवण, मातीच्या रंगाची रक्त मिश्रित, घाण वास येणारी विष्ठा.

आतडी पूर्णपणे घट्ट झाल्यामुळे वासरांना विष्ठा होत नाही. वासरे पाठीमधून कण्हत सतत विष्ठा टाकण्याचा प्रयत्न करतात.

उपाय

वासरांना वयाच्या सातव्या दिवशी पहिली जंतनाशकाची मात्रा द्यावी

Animal Care
जनावरांची खुरे नरम पडल्यावर काय करावे?

रक्ती हगवण (कॉक्सीडीओसिस)

वासरे, करडे आणि कोकरांनी माती चाटण्यास सुरुवात केल्यास, त्यांना या आदिजीवाची लागण होते.

लक्षणे

पातळ आवमिश्रित, रक्तमिश्रित हगवण होते.करडे आणि कोकरांमध्ये गुदद्वार आणि शेपटी सभोवतालचा पूर्ण भाग माखलेला दिसतो.

उपाय

वासरे, करडांना माती चाटण्यापासून परावृत्त करणे. गोठ्याची दैनंदिन स्वच्छता ठेवावी.

वासरे, करडांना रक्ती हागवणरोधक औषधांची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्याने द्यावी. उदा. अॅम्प्रोलियम इ.

गोठ्यात क्षार व खनिज विटा बांधाव्यात. जेणेकरून वासरे माती ऐवजी क्षार विटा चाटतील.

क्रिप्टोस्पोरीडियम

गाईच्या वासरात आढळणारा रक्ती हगवण सारखा आदिजीवजन्य आजार आहे. वासरामध्ये परजीवीची लागण होते. तसेच विष्ठेद्वारे या आदिजीवाची लागण मानवास देखील संभवते.

उपाय

गोठ्याची स्वच्छता, वासरांमध्ये योग्यवेळी निदान आणि लागण झालेल्या वासरांची शुश्रूषा करावी.

वासरांचे व्यवस्थापन

वयाच्या सातव्या दिवशी प्रथम जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. वासरे, करडे,कोकरे यांचा योग्य वाळजीसह रक्ती हगवण आजार नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com