शेळ्यांच्या आहारात वापरा या झाडांचा पाला !

शेळ्यांच्या आहारात चारा पिकांबरोबर झाडांच्या पाल्याचा समावेश करू शकतो. झाडपाल्यामध्ये प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण उत्तम असल्यामुळे शेळ्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.
शेळ्यांच्या आहारात वापरा या झाडांचा पाला !
Tree leaves for goat feedAgrowon

शेळ्यांसाठी (Goat Farming) चारा म्हणून झाडपाल्याचा वापर केल्यास हिरव्या वैरणीचा (green fodder) जवळपास ४० टक्के खर्च शेळीपालक कमी करू शकतात. खाद्यावरील खर्च कमी झाल्यास उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. शेळ्या झाडाचा पाला खूप आवडीने खातात. इतर चारा पिकांबरोबर झाडपाल्यामध्ये प्रथिने (protein) आणि खनिजांचे (minerals) प्रमाण उत्तम असल्यामुळे शेळ्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

आपल्याकडे शेतकरी मुक्त पद्धतीचे शेळीपालन करताना दिसतात. या पद्धतीमध्ये शेळ्यांना दिवसभर शेतातून, डोंगरातून, चराईक्षेत्रात चरायला सोडले जाते. चराईक्षेत्रात शेळ्यांची दिवसभराची चाऱ्याची गरज भागविली जाते. परंतु आजकाल चराईक्षेत्राचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. याचा परिणाम म्हणून शेळीपालनाची बंदिस्त पद्धत पुढे आली. शेळ्यांची चाऱ्याची गरज भरून काढण्यासाठी झाडांचा पाला एक चांगला पर्याय आहे. यामध्ये शेवरी, सुबाभूळ, बाभूळ, बोर, अंजन यांसारख्या झाडांच्या पाल्याचा आहारात समावेश करू शकतो.

Tree leaves for goat feed
जाणून घ्या, शेळी निवडीचे निकष

शेवरीची लागवड बहुवार्षिक द्विदल चारा पिक म्हणून करता येते. शेवरीची लागवड सर्वसाधारणपणे बांधावर केली जाते. शेवरीच्या पानात कॅल्शियम, प्रथिने, स्फुरद यांचे प्रमाण उत्तम असते. जमिनीची धूप थांबवण्यासाठीही शेवरीची मदत होते. शेवरीमध्ये १८.२ टक्के पचनीय प्रथिने व ५६.८१ टक्के एकूण पचनीय पदार्थ असतात.

Tree leaves for goat feed
शेळी का अडते?

सुबाभूळ हे सर्व शेळ्यांसाठी उपयुक्त चारापीक आहे. सुबाभूळ कमी पाण्याच्या भागातही चांगल्या चाऱ्याचे उत्पादन देते. सुबाभळीच्या चाऱ्यामध्ये जवळपास २० ते २२ टक्के प्रथिने असतात. सुबाभळीच्या हिरव्या शेंगा लुसलुसीत व मऊ असतात. बियांचा वापर शेळ्यांच्या खुराकात करता येतो. शेळ्यांच्या आहारात सुबाभळीचा वापर ४० टक्के पर्यंत करावा.

बाभळीची झाडे जवळजवळ सर्वच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला, शेताच्या बांधावर आढळून येतात. शेळ्या या झाडाचा पाला व शेंगा आवडीने खातात. या चाऱ्यामध्ये १४-१५ टक्के प्रथिने असतात. बाभळीची झाडे तर मुक्त शेळीपालनाचा मुख्य आधार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com