‘गोकुळ’कडून पशुखाद्याची दरवाढ अपरिहार्य ः विश्‍वास पाटील

युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या मालाची कमतरता आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती, वाहतूक भाड्यात झालेली वाढ, कच्च्या मालात ३५ टक्क्यांपर्यंत झालेली दरवाढ यामुळे महिन्याला सुमारे दीड कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे.
‘गोकुळ’कडून पशुखाद्याची दरवाढ अपरिहार्य ः विश्‍वास पाटील
Animal FeedAgrowon

हातकणंगले, जि. कोल्हापूर ः युक्रेन-रशिया युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या मालाची (Row Material) कमतरता आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती, वाहतूक भाड्यात झालेली वाढ, कच्च्या मालात ३५ टक्क्यांपर्यंत झालेली दरवाढ यामुळे महिन्याला सुमारे दीड कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. इतर संघांनी अगोदरच केलेली दरवाढ यामुळे गोकुळलाही पशुखाद्य (Animal Feed) दरवाढ करणे अपरिहार्य ठरत आहे, असे मत अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केले.

कुंथुगिरी (आळते) येथे गोकुळ दूध संघ संलग्न संस्था प्रतिनिधी व उत्पादकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. दरवाढीबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वागत केले. बाळगोंडा पाटील (किणी), सुनील भोकरे (कुंभोज), अभिजित आरगे (कुंभोज), प्रताप पाटील (माले), अस्लम मुल्लाणी (किणी), नितीन खाडे (सावर्डे), नितीन सूर्यवंशी (मनपाडळे) या दूध उत्पादकांचा सत्कार केला. संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. उदयकुमार मोगले, वैरण विकास व्यवस्थापक भरत मोळे, महालक्ष्मी पशुखाद्य व्यवस्थापक व्ही. डी. पाटील, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी बी. डी. चौगुले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ऋषिकेश आंग्रे आदींनी मार्गदर्शन केले. उपव्यवस्थापक दत्ता वाघरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com