Livestock Market : बंदी उठवल्याने जनावरांचे बाजार पूर्ववत

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात कोठेही प्राण्यांचे बाजार, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती भरून भरवता येणार आहेत.
Livestock market
Livestock marketAgrowon

नाशिक : जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) कमी झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यात्रा आणि जनावर बाजारावरील (Livestock Market Ban) बंदी उठवली आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी आणि जनावरांच्या बाजाराला परवानगी दिल्याने नागरिकांना शर्यतीचा आनंद घेता येणार आहे.

Livestock market
Livestock Market : जनावारे बाजारांवर चार दिवसांत निर्णय

राज्यभरात लम्पी आजाराने अनेक शेतकऱ्यांनी जनावरे गमावली. त्यामुळे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गोवंश जाती प्रजातीची सर्व गुरे मशिनची वाहतूक करण्यास, तसेच वैरण, गवत, चारा किंवा अन्य साहित्य बाधित प्राण्यांचे मृतदेह कातडी व शरीराच्या कोणत्याही भागाची वाहतूक करण्यास मज्जाव होता.

Livestock market
Livestock Market : प्रतिबंधित पशुबाजार, गुरांची वाहतूक पूर्ववत

खबरदारीचे उपाय पाळून नाशिक जिल्ह्यात कोठेही प्राण्यांचे बाजार, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती भरवता येणार आहेत. तसेच गुरांची वाहतूक यावर निर्बंध होते. केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील घोटी, सिन्नर या ठिकाणी बैल बाजार भरवला जात होता. या वेळी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर बंदी आल्याने ही उलाढाल ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेला पाहावयास मिळणार आहे.

...असे पाळावे लागतील निकष

वाहतुकीसाठी २८ दिवस आधी लसीकरण झाले असावे.

जनावरांची ओळख पटविण्यासाठी क्रमांक, इनाफ पोर्टलवर नोंदणी

वाहतुकीसाठी आरोग्य प्रमाणपत्र, आरोग्य दाखला बाळगणे आवश्‍यक

पशू बाजारात प्रदर्शन बैलगाडा शर्यत आयोजकांना टॅगिंग पॉलिसीची खात्री गरजेची.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com