Livestock Market : धुळ्यात जनावरांचा बाजार सुरू

‘लम्पी’मुळे जनावरांचा बाजार थांबल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला होता.
Livestock market
Livestock market

धुळे ः पुणे जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाल्याने पशू बाजारासह गुरांच्या (Livestock Market) वाहतुकीस अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

Livestock market
Livestock Market : प्रतिबंधित पशुबाजार, गुरांची वाहतूक पूर्ववत

‘लम्पी’मुळे जनावरांचा बाजार थांबल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला होता. आता मात्र बाजार सुरू होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गायवर्गीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्रीसह प्राण्यांचे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली होती.

Livestock market
Livestock Market : आळेफाटा येथील गायींचा बाजार उद्यापासून सुरू

लम्पी स्कीन प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कोणताही बाजार भरविणे व जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

लसीकरण आवश्यक

जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी स्कीनचे २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झाले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गायवर्गीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे, तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील. संक्रमित/संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com