Animal Husbandry : पशुपालकांची होत आहे लूट

हरियाना, पंजाब या भागांतील एचएफ, जर्सी यांचे दूध उत्पादन अधिक आहे. त्यामुळेच या भागातील जनावरांना पशुपालकांची मागणी राहते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Nagpur : परराज्यांतून अधिक दूध क्षमता (Milk Capacity) असलेल्या जनावरांची खरेदी करणाऱ्या पशुपालकांच्या (Animal Breeder) फसवणुकीचे प्रमाण वाढीस लागल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आले आहेत.

त्यातही आजारी जनावरांची विक्री अशा व्यवहारांमध्ये होत असल्याने पशुपालकांना दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे.

हरियाना, पंजाब या भागांतील एचएफ, जर्सी यांचे दूध उत्पादन (Milk Production) अधिक आहे. त्यामुळेच या भागातील जनावरांना पशुपालकांची मागणी राहते. नजीकच्या काळात मध्य प्रदेशातील संकरित जनावरे खरेदीचा ट्रेंडही वाढीस लागला आहे.

परंतु मध्य प्रदेशातून जनावरांची खरेदी करताना चालकाशी संगनमत करून काही जातीय संघटना गोवंशाची तस्करी म्हणून गायी घेऊन जाणाऱ्या चालकाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट करतात.

Animal Husbandry
Animal Market : शिरपुरात पशुपालक मालामाल

जनावरांची खरेदी केल्यानंतर ती त्याच भागातील वाहनात भरली जातात. चालक मध्य प्रदेशातीलच असतो. गावापासून दहा ते १५ किलोमीटर गेल्यावर काही संघटनांचे पदाधिकारी वाहनाचा मार्ग अडवितात.

कत्तलीसाठी तस्करी होत असल्याचा आरोप करून मारहाणीची धमकी देतात. चालक वाहन सोडून पळून जातो. जिवाच्या भीतीने पशुपालक देखील पळतो, वाहन तिथेच राहते.

काही वेळाने हे वाहन परत त्याच गोठ्याच्या मार्गावर धावते आणि जनावरे पुन्हा मूळ मालकाला परत केली जातात, अशी साखळी विकसित झाल्याचा आरोप काही पशुपालकांनी केला आहे. यात संबंधितांना देखील या नाटकासाठी ठरावीक कमिशन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जातीयवादी संघटना असल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारीसाठी देखील कोणीच धजत नाही, असेही पशुपालकांनी सांगितले. हरियाना भागातील जनावरांच्या खरेदीतही मोठी फसवणूक होत असल्याचा आरोप आहे. ब्रुसेलाग्रस्त जनावरांची विक्री या भागातून होते.

त्यामुळे जनावर महाराष्ट्रात आणल्यानंतर गायीला गर्भधारणाच होत नव्हती, तिसऱ्या, सातव्या महिन्यात गर्भपात होतो. पुढे अडचणी येतात, अशा समस्यांना पशुपालक सामोरे जात आहेत.

Animal Husbandry
Women Empowerment : भटक्या पशुपालक महिलांचे प्रश्न कधी सुटणार ?

आजारी जनावरांच्या विक्रीचे प्रमाण हरियाना भागात वाढल्याचे काही पशुपालकांनी सांगितले. त्याचा फटका लाखो रुपयांत जनावरांची खरेदी करणाऱ्यांना बसत आहे. ७० हजार ते १ लाख रुपयांना त्या भागात गाय विकली जाते. वाहतुकीवर १० ते १५ हजार रुपयांचा खर्च होतो.

मध्यस्थी व्यक्‍तीला देखील कमिशन म्हणून ठरावीक रक्‍कम अदा करावी लागते. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो.

आपल्या भागात १९७९ मध्ये श्‍वेतक्रांतीअंतर्गत वंशावळ सुधारणेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात मर्यादा घालण्यात आल्याने यातून फार काही साध्य झाले नाही. त्यामुळेच हरियाना, मध्य प्रदेशातून गायींची खरेदी करावी लागते. या गायी आपल्या वातावरणात ३५ ते ४० लिटर दूध देतात. परंतु मध्य प्रदेशात पशुपालकांच्या लुटीचे प्रकार समोर आले आहेत. हरियाना भागातून आजारी जनावरे पाठविली जातात. परिणामी महाराष्ट्र सरकारनेच या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे.
रामनाथ वदक, झेप शेतकरी उत्पादक कंपनी, निमगावजाळी, ता. संगमनेर, अहमदनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com