Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’मुळे राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक झाले आहे.
Lumpy Scene Disease
Lumpy Scene DiseaseAgrowon

औरंगाबादः जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Scene Disease) वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना (Preventive measures) करणे आवश्‍यक झाले आहे. त्यामुळे आता प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ (controlled area) म्हणून घोषित केले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता यांनी या विषयी गुरुवारी (ता. ८) अधिसूचना काढली आहे.

गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तमिळनाडू, तेलंगणा व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. लम्पी स्कीन हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. सर्व राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे.

Lumpy Scene Disease
Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय, भारत सरकार यांनी १८ ऑगस्ट, २०२२ रोजी बैठक बोलावली होती. त्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अवगत केले होते.

...असे आहेत निर्बंध

- जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई

- आजारग्रस्त जिवंत किंवा मृत जनावरे, त्यांच्या संपर्कात आलेली वैरण नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई.

- जनावरांचा बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन भरविण्यास मनाई

बुधवारपर्यंत १७ जिल्ह्यांत २५ गुरांचा मृत्यू

लगतच्या राज्यांमधून महाराष्ट्रात प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. परंतु आता संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित केल्याने आजाराच्या निमूर्लनास मदत होईल. ‘लम्पी स्कीन’मुळे राज्यातील १७ जिल्ह्यांत ५९ तालुक्यांमध्ये बुधवारपर्यंत (ता. ७) प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २५ गुरे व म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे.

१९ जिल्ह्यांत २१८ गावांत प्रादुर्भाव

राज्यात ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल गावात ‘लम्पी स्कीन’सदृष्य आजाराची लक्षणे निदर्शनास आली. त्यानंतर राज्यात जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशीम व नाशिक या १९ जिल्ह्यांत ९ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण २१८ गावांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

Lumpy Scene Disease
Rice Export Ban: तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी

३४ जनावरांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील १२, नगरमधील १२, अकोल्यात १, पुण्यात ३, बुलडाण्यात ३ व अमरावती जिल्ह्यात ३ अशा एकूण ३४ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून सुरवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे राज्यात जनावरांच्या मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यात आतापर्यंत यश आले आहे.

पावणेचार लाख पशुधनाचे लसीकरण..

बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातील १०७२ गावांतील एकूण ३ लाख ६७ हजार ६८० पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. प्रादुर्भावग्रस्त गावांतील एकूण १८८१ प्रादुर्भावग्रस्त पशुधनापैकी एकूण ११०९ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित पशुधनावर उपचार सुरु असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com