Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Lumpy Skin : सांगलीत दीडशे जनावरांना प्रादुर्भाव

आतापर्यंत १५३ जनावरांना या आजाराची लागण झाली असून आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २० जनावरे या आजारातून बरी झाली आहेत.

सांगली ः जिल्ह्यात रोज १० ते १५ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Infection To Animal) प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत १५३ जनावरांना या आजाराची लागण (Lumpy Skin Vaccination) झाली असून आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू (Animal Death lumpy Skin) झाला आहे. तर २० जनावरे या आजारातून बरी झाली आहेत.

जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. वाळवा तालुक्यात ९० जनावरांना आजाराची लागण झाली असून त्यापाठोपाठ मिरज तालुक्यातील जनावरे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : कुपटीच्या कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी होणार गोरक्षक दूत

परंतु प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि दूध संघाच्या माध्यमातून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वच जनावरांना लसीकरण मोहीमदेखील सुरू केली आहे. शुक्रवारअखेर (ता. २३) ७१ हजार २१२ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : बैलपोळ्यावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

जिल्ह्यातील मिरज तालुक्यात १ तर पलूस तालुक्यात २ आणि वाळवा तालुक्यातील १ अशी एकूण चार जनावरे या आजारामुळे दगावली आहेत. शिराळा आणि तासगाव तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत आजाराचे नियंत्रण करण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले असल्याचे दिसते आहे.

आटपाडी तालुक्यात ३, जत तालुक्यात ७, कडेगाव तालुक्यात १, कवठे महांकाळ तालुक्यात ३, खानापूर तालुक्यात ५, मिरजमध्ये ३०, पलूस तालुक्यात १४ आणि वाळवा तालुक्यात ९० जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली आहे. लम्पी स्कीनची लस उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात १ लाख ६३ हजार १०० लसी उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com