Lumpy Skin : सोलापुरात जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा पुन्हा प्रादुर्भाव

Lumpy Disease : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना, आता पुन्हा एकदा त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुख्यतः अक्कलकोट, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांत लम्पी स्कीन बाधित जनावरे आढळून आली आहेत.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Solapur News : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना, आता पुन्हा एकदा त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुख्यतः अक्कलकोट, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांत लम्पी स्कीन बाधित जनावरे आढळून आली आहेत. सध्या जिल्ह्यात ६७७ इतक्या जनावरांना लागण झाली आहे. त्यात या तीन तालुक्यांतील सर्वाधिक ३८६ जनावरांचा समावेश आहे.

लम्पी स्कीनने सुरुवातीच्या टप्प्यात माळशिरस, करमाळा आणि सांगोला तालुक्यांत मोठ्या प्रमाणात हानी केली. पण पशुसंवर्धन विभागाने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर जिल्ह्यात बऱ्यापैकी लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाला होता.

Lumpy Skin
Lumpy Skin : राज्यात ३७ हजार ६२८ जनावरे लंपीने दगावली; पशुपालकांना मदतनिधी दिल्याची विखेंची माहिती

पण आता पुन्हा एकदा त्याने डोके वर काढले आहे. त्यातही मोहोळ, अक्कलकोट आणि मंगळवेढ्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या मोहोळमध्ये १५४ जनावरे लम्पीने बाधित आहेत. त्यानंतर मंगळवेढ्यात १४०, तर अक्कलकोटमध्ये ९२ जनावरे आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ३९ हजार ५७० जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली होती. त्यापैकी ३५ हजार २३५ जनावरे बरी झाली आहेत. तर ३ हजार ६८५ इतक्या जनावरांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Compensation : पशुपालकांना ५७ लाख ७३ हजार रुपये भरपाई वाटप

सर्वाधिक १ हजार ३१२ मृत्यू झालेली जनावरे माळशिरस तालुक्यातील आहेत. त्यानंतर अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढ्याला झळ बसली आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना, आता पुन्हा हा प्रसंग त्यांच्यावर येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

साडेसात कोटींची मदत

जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १९१ मृत जनावरांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ कोटी ६० लाख सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनुदान वाटपाचे ४५२ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. या प्रस्तावांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास एक कोटी २० लाख रुपयांचे अनुदानवाटप केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com