Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’बाबत नंदुरबारात आढावा

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ या साथरोगाची लक्षणे आढळून येत असल्याने ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने त्वरित लसीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) या साथरोगाची लक्षणे (Lumpy Skin Symptoms) आढळून येत असल्याने ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) त्वरित लसीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

Lumpy Skin
Lumpy Skin Vaccination : वाशीम जिल्ह्यात ९१ हजार पशुधनांचे लसीकरण

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात झाली. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रताप पावरा, डॉ. मनोज पावरा आदी उपस्थित होते.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : सैन्य-अस्त्राविनाच ‘लम्पी’शी लढाई

मनीषा खत्री म्हणाल्या, की जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदूपासून पाच किलोमीटर परिसरात लसीकरणास सुरुवात करावी. लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत तीन वाहने द्यावी. लसीकरणासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून लसीकरणास गती द्यावी, असे आवाहनही मनीषा खत्री यांनी या वेळी केले.

५० नमुने तपासणीसाठी

या वेळी श्री. पाटील म्हणाले, की हा आजार म्हैस वर्गातील जनावरांमध्ये कमी प्रमाणात असून गाय, बैल, वासरू या पशुमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे जास्त प्रमाणात आहेत. आतापर्यंत ३२ गावांतील ५० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकाही जनावराचा या आजारामुळे मृत्यू झालेला नाही. आजारामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गोट पॉक्स लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, आतापर्यंत दहा हजार जनावरांचे लसीकरण झाल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com