Madgayal Sheep Rearing : मांस उत्पादनासाठी माडग्याळ मेंढी

देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन
काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धनAgrowon

भारत वगळता इतर बहुतांश देशांमध्ये दैनंदिन आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते. ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन आदी देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठा वाव आहे. जरी मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. महात्मा फुले कृषीविद्यापीठाने माडग्याळ मेंढीच्या वैशिष्ट्यांविषय़ी पुढील माहिती देली आहे.

काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन
मडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये

देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर, राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध असून, ही जात काटक आहे. 

- सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावच्या सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहांकाळ, रांजणी या गावात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात. 

- माडग्याळ या गावावरूनच या मेंढ्यांना हे नाव प्राप्त झाले आहे. दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्यांची शरीर वाढ चांगली असते. बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करतात. 

काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन
Goat Farming : शेळीपालन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. प्रतिकूल वातावरणात तग धरतात. 

- मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ३.५ किलो असते. तीन महिने वयाच्या मेंढीचे वजन १८ ते २२ किलो व ६ महिने वयाच्या मेंढीचे वजन २५ ते ३० किलो आहे. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४० ते ४५ किलो एवढे भरते.

- तीन महिने वयापर्यंत या मेंढीच्या वजन वाढीचा दर १७५ ते २४० ग्रॅम प्रतिदिन एवढा आहे. या मेंढ्यांच्या अंगावर लोकर अत्यंत कमी असून त्यांची लोकर वर्षातून फक्त एकदाच काढतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com