‘पशुसंवर्धन’च्या योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम

पशुसंवर्धन (Animal Husbandry) पायाभूत सुविधा विकास निधी योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी या वेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला (Maharashtra) पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

नवी दिल्ली ः केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन (Animal Husbandry) पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरूकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Parshottam Rupala) यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयातर्फे येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

राज्ये, उद्योजक आणि बँकांना या वेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पशुसंवर्धन (Animal Husbandry) पायाभूत सुविधा विकास निधी योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी या वेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कर्नाटकला दुसरा तर उत्तरप्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्रातील २० उद्योजकांचा सन्मान

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे. या वेळी ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूरमधील ज्योर्तिलिंग मिल्क फूड आणि नगरमधील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

या मुख्य कार्यक्रमानंतर राज्यातील अन्य व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या मध्ये गोविंद फीड मिल, रोहिणी सुचित्रा पोवार, अनुप श्रीनिवास पडमल (कोल्हापूर), पुण्यातील विशाल अशोक मोकाशी, हुवेफार्मसी पुणे प्रा. लि, नेचर डिलाईट कॅटल फीड्स प्रा. लि., ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. यांना गौरविण्यात आले.

नगरमधील कृष्णा डेअरी आणि मुंबई येथील ‘ग्रॅव्हिस फूड्स’, नागपूरमधील गौगंगा फूड, जलाराम व्हेटकेअर इंडस्ट्रीज, सोलापुरातील गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. साताऱ्यातील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् आणि उस्मानाबादमधील मयूर पाटील, दमयंती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, रायगडमधील डेलेक्टो फूड्स, बीडमधील विमल ॲग्रो आणि सांगलीतील एम. एस. बी. जी. चितळे यांनाही गौरविण्यात आले.

७९३ कोटींचे कर्जवितरण

केंद्र शासनाने पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष २०२० मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडे एकूण ९१६ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी पात्र ७३ अर्जांमधून आतापर्यंत २६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. या उद्योजकांना ७९३ कोटींचे कर्जवितरण आणि ५३ कोटींच्या व्याज सवलतीसह राज्य शासनाला १५ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com