Artificial Insemination : कृत्रिम रेतनाला चालना देण्यासाठी ‘मैत्री’ प्रकल्प

देशात कृत्रिम रेतन करण्यासाठी २ लाख १६ हजार तज्ज्ञांची गरज असताना सद्यःस्थितीत केवळ एक लाख तज्ज्ञांची उपलब्धता आहे.
Artificial Insemination
Artificial Insemination Agrowon

नागपूर ः ग्रामीण भागातील गाई, म्हशींसाठी कृत्रिम रेतनासोबत (Artificial Insemination) जनावरांसाठी प्रथमोपचार (Animal Health) सुविधा देणाऱ्यांची वानवा आहे. देशात कृत्रिम रेतन करण्यासाठी २ लाख १६ हजार तज्ज्ञांची गरज असताना सद्यःस्थितीत केवळ एक लाख तज्ज्ञांची उपलब्धता आहे.

Artificial Insemination
Animal Care : चारा व्यवस्थापनासह योग्य लसीकरण महत्त्वाचे

अशा सेवा देणाऱ्या उर्वरित एक लाखांवर तज्ज्ञांचा अनुशेष दूर करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन मंडळाने महाराष्ट्रात बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तज्ज्ञ (मल्टी पर्पज आर्टिफिशियल इनसेमिनेशन टेक्निशियन), अर्थात ‘मैत्री’ संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राज्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २२० सुशिक्षित तरुणांना कृत्रिम रेतन व प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Artificial Insemination
Animal Care : जनावरांतील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?

गावपातळीवर जनावरांवर तत्काळ उपचार, कृत्रिम रेतनाकरीता पुरेशा सुविधा नसल्याने पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन देशभरात राष्ट्रीय पशुधन मंडळाकडून देशाच्या विविध राज्यांमध्ये ‘मैत्री’ प्रकल्प राबविला जात आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन मंडळाच्या माध्यमातून ‘माफसू’द्वारे होत आहे. या अंतर्गत २२० व्यक्‍तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

त्यामध्ये मुंबई, नागपूर, शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येकी ३० आणि परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून ६० तसेच उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाद्वारे ७० तरुण युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीन महिने कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम याकरिता तयार करण्यात आला होता.

अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांची परीक्षाही घेण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून २२० तज्ज्ञ व्यक्‍ती उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्याद्वारे आता गावपातळीवर कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध होईल.

कृत्रिम रेतनाची भारताची टक्‍केवारी सध्या ३० टक्‍के इतकी अत्यल्प आहे. ही ७० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. केरळसारख्या प्रगत राज्यात हेच प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे ‘मैत्री’सारख्या उपक्रमातून कृत्रिम रेतन आणि गावपातळीवर तत्काळ प्रथमोपचार करण्याकरिता तज्ज्ञांची उपलब्धता शक्‍य होणार आहे.

- डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

स्वयंरोजगार निर्मितीचा उद्देश प्रकल्पातून साधला जाणार आहे. याकरिता प्रशिक्षणार्थींना ५० हजार रुपयांचे कीट देण्यात येणार आहे. गावात प्रथमोपचार व कृत्रिम रेतनाला या प्रकल्पाद्वारे चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

- डॉ. धनंजय परकाळे, उपायुक्त, पशुसंवर्धन, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com