Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणाचे मोठे आव्हान

राजस्थान, गुजरातमध्ये दुधाळ जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला ‘लम्पी स्कीन’ आजार महाराष्ट्रात फोफावला नसला असला, तरी या रोगाचे राज्यातील नियंत्रणाचे आव्हान कायम आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

पुणे : राजस्थान, गुजरातमध्ये दुधाळ जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला ‘लम्पी स्कीन’ आजार (Lumpy Skin Disease) महाराष्ट्रात फोफावला नसला असला, तरी या रोगाचे राज्यातील नियंत्रणाचे आव्हान कायम आहे. सरकार, दूध संघ, साखर कारखाने आणि गावपातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांच्या पातळीवर हा रोग सध्या नियंत्रणात (Lumpy Skin Disease Control) आहे. लसींचीही (Lumpy Skin Vaccine) पुरेशी उपलब्धता आहे, मात्र पशुसंवर्धन विभागात (Department Of Animal Husbandry) असलेले कमी मनुष्यबळ, दळण-वळण साधने, उशिराने सुरू झालेला टास्कफोर्स (Lumpy Skin Task Force) आदी कारणांनी नियंत्रणाचे काम काही प्रमाणात प्रभावितही झाले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : साताऱ्यात पाच जनावरांचा मृत्यू

पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सुमारे सव्वा कोटी गोवंशापैकी सद्य:स्थितीत ५ हजार ५१ पशुधन म्हणजे ०.०३६ टक्के एकूण बाधित जनावरांचे प्रमाण आहे. आतापर्यंत ८९ पशुधन मृत झाल्याची माहिती आहे. राज्यात ‘लम्पी स्कीन’ची साथ पूर्णतः नियंत्रणात असल्याचा विभागाचा दावा आहे, सद्य:स्‍थितीत २४ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. दररोज दोन लाख पशुधनांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असले, तरी पुरेशा मनुष्यबळाऐवजी हे आव्हान कसे पार पाडायचे हा प्रश्‍न विभागासमोर आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील १ हजार २० विद्यार्थी आणि खासगी पशुवैद्यकांची मदत घेतली जात आहे. यासाठी त्यांना मानधन देखील दिले जात आहे. लसीकरणासाठी सध्या राज्यात एकूण २३ लाख ८३ हजार लसमात्रा उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवसांत अजून ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

पशुपालकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपचारांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. एखादे पशुधनाला लक्षणे आढळत असतील, तर त्याला तातडीने वेगळे करून त्यावर तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करावेत. असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी केले आहे. तर बाधित पशुधनावरील औषधोपचार मोफत असून, कोणी पैशांची मागणी केल्यास तातडीने टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे देखील त्यांना सांगितले.

अफवा पसरविण्यांविरोधात कठोर कारवाई

‘लम्पी स्कीन’मुळे दूध पिण्यास आणि चिकन खाण्यास योग्य नसल्याबाबतच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत. अशा लोकांवर बारीक नजर ठेवली जात आहे. अशांवर सायबर क्राइम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.

दूध पिण्यास उत्तम

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव सव्वा कोटी गोवंशापैकी केवळ ५ हजार गोवंशाला बाधा झाली आहे. त्यामुळे दूध संकलनात कोणतीही घट झालेली नाही, तर दूध पिण्यास देखील कोणताही धोका नाही. त्यामुळे याबाबतची अफवा पसरविणाऱ्यांविरोधात देखील कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

शेळ्या मेढ्यांच्या बाजार सुरूच

‘लम्पी स्कीन’मुळे केवळ गोवंशाच्या वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र शेळ्या मेंढ्यांच्या वाहतूक विक्री आणि बाजारांवर कोणतीही बंदी नाही. त्यामुळे बंदीच्या आडून कोण पशुपालकांची फसवणूक आणि लूट करत असेल तर त्यांच्या विरोधात टोल फ्री क्रमांक १८००-२३३- ०४१८, राज्यस्तरीय कॉल सेंटरशी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. संबधितांवर कारवाई केली जाईल.

‘‘लम्पी स्कीन आजारामुळे पशुधन अडचणीत आहे. यंदाच्या वर्षी प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावर घटीवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडणार आहे. शासनाने सर्व पशुधनाचे लसीकरण करणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्याचा वेग फारसा नाही. सरकारी पशुतज्ज्ञांची कमतरता असल्याने शेतकरी स्वतः खासगी पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करून घेतील. शासनाने तातडीने लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.’’ -
रखमाजी जाधव, पाथरे, ता.राहुरी, जि. नगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com