पावसाळ्यात घ्या, वासरांची विशेष काळजी!

पावसाळ्यात वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे किंवा पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनावरांना विविध रोगांची लागण होत असते. जनावरे अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडत असतात. असं होऊ नये म्हणून पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात घ्या, वासरांची विशेष काळजी!
Care Of Cow Calf In Monsoon Agrowon

कमी रोगप्रतिकार शक्ती असलेली जनावरे, वासरे कोणत्याही आजाराला बळी पडण्याचे प्रमाण जास्त असते. जनावरे आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जास्त काळजी घेणं हितकारक असते. पावसाळ्यातील (monsoon) काही आजार हे संसर्गजन्य असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

पावसाळ्यात वासराचे पावसापासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात वासरांची (calf) शेड कोरडी राहील याची विशेष काळजी घ्यावी. वासरे राहण्याची जागा जास्त काळ ओलसर राहिल्यास त्यांना सर्दी, खोकला होण्याची दाट शक्यता असते. तापाची तीव्रता जास्त असल्यास काही वेळेस त्यांचा मृत्यु देखील होण्याची संभावना असते.

Care Of Cow Calf In Monsoon
वासरांचे गुडघे का सुजतात?

पावसाळ्यात वासरांना स्वच्छ, निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे. पावसाळ्यात नवीन वासराचा जन्म झाल्यास लवकरात लवकर त्याला आईचा चिक पाजावा. चीकामुळे वासरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होते. वासराची नळ कापून त्यावर

Care Of Cow Calf In Monsoon
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

टिंक्चर आयोडीन लावावे. जखम लवकर कोरडी होईल याची विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात अतिरिक्त हिरवा चारा खाल्ल्याने त्यांना हगवणीसारखे आजार होत असतात.
असे होऊ नये म्हणून गोठ्यात स्वच्छता राखावी. वासरांना सकस आहार पुरवावा. रोगांची लागण टाळण्याकरिता वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com