
Solapur News : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात विशेषतः सांगोला व मंगळवेढा या भागात शेतीस जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाला (Dairy Business) पशुखाद्याच्या सततच्या वाढत्या दरांमुळे घरघर लागली आहे.
दुधाच्या पैशातून जनावरांना वैरण, पशुखाद्य (Animal Feed) अन् वेगवेगळ्या आजारांवर होणाऱ्या खर्चाचे गणित शेतकऱ्यांना जुळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत.
दरम्यान, दुभत्या जनावरांसाठी सरकी पेंड, गोळी पेंड, मक्याचा भरडा, शेंग पेंड, गहू भुशी याबरोबरच वेगवेगळी सप्लिमेंट्स ठेवावी लागतात. शिवाय ओला व वाळलेला चारा समप्रमाणात ठेवल्यास गाईचे आरोग्य व्यवस्थित राहाते व दुधात सातत्य टिकते.
पण एवढे खाद्य देण्यासाठी गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर किमान ४८ ते ५० रुपये हवा, असे दूध उत्पादकांचे मत आहे. दुधात दरवाढ नाही झाल्यास व पशुखाद्याच्या किमती कायम राहिल्यास या उन्हाळ्यात हा व्यवसाय अडचणीत येईल, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.
पशुखाद्याचे दर (५० किलो गोणी)
सरकी पेंड : २००० रुपये
चुरा पेंड : २८०० रुपये
गोळी पेंड : १७०० रुपये
भरडा : १३०० रुपये
गहू भुशी : ११०० रुपये
चारा दिवसभरासाठी : १५० रुपये
एका गाईमागे राहतात ७० रुपये
एका गाईसाठी दररोज दहा किलो पशुखाद्य ठेवावे लागते. प्रतिकिलो ४० रुपयांप्रमाणे ५०० रुपये होतात. एक सुदृढ गाय सरासरी १५ लिटर दूध देते.
लिटरला ३८ रुपयांप्रमाणे ५७० रुपये होतात. म्हणजे फक्त ७० रुपये एका गाईमागे दिवसाला राहतात. यात औषधांसाठीचा खर्च वेगळा असतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.