
पशुधनाचे संगोपन करत असताना वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध बरा (Prevention is better than cure) . जवळपास सर्वच साथीच्या रोगांमध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यास, जनावरे मृत्युमुखी पडण्याची संभावना असते. परंतु अजूनही काही भागांमध्ये पशुपालक जनावरांच्या लसीकरणाबाबत टाळाटाळ करताना दिसतात. लसीकरणाबाबत त्यांच्या मनात अनेक संभ्रम दिसतात.
लसीकरणाबाबतच्या शंका (misconception of animal vaccination)-
जनावरांना ज्या ठिकाणी लस दिली जाते, त्या ठिकाणी गाठ येते?
कोणतीही लस दिल्यानंतर सुरुवातीला त्याठिकाणी गाठ येते, काही वेळेस वेदना होतात. अशा ठिकाणी बर्फ लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
साथ आल्यानंतर लसीकरण करून काही फायदा होतो का?
साधारणपणे कोणत्याही रोगाविरुद्ध लसीकरण केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागत असतो. या कालावधीत जनावरांना रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठराविक रोगांचे ठराविक अंतराने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचं आहे.
लस दिल्यानंतर जनावरांचे दूध उत्पादन कमी होत असते ?
लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरावर तात्पुरता ताण येत असतो. त्यामुळे काही प्रमाणात दूध उत्पादनात घट दिसून येते. परंतु ती तात्पुरती असते.
पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. लसीकरण करून पशुपालक भविष्यात जनावरांवरील उपचारांचा अतिरिक्त खर्च वाचवू शकतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.