Livestock Market : गुरांचे बाजार पूर्ववत सुरू करण्याचे आदेश

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केलेले जनावरांचे बाजार पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
Livestock Market
Livestock Market Agrowon

अकोला ः लम्पी स्कीन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केलेले जनावरांचे बाजार (Livestock Market) पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. बाजार भरवण्यावर निर्बंध आल्याने गेले काही दिवस जिल्ह्यात गुरांची खरेदी व विक्री करण्यात अडचणी येत होत्या. आता हे बाजार पुन्हा सुरू करण्याची परवानगी काही अटी व शर्थींच्या अधीन राहून देण्यात आली आहे.

Livestock Market
Livestock Market : आळेफाटा येथील गायींचा बाजार उद्यापासून सुरू

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुसंडी मारली होती. या आजारांमध्ये अनेक जनावरे दगावली आहेत. या आजाराने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. लम्पी स्कीन हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे काही निर्बंध तातडीने घालण्यात आले होते.

Livestock Market
Livestock Market : धुळ्यात जनावरांचा बाजार सुरू

वैरण, साहित्य, कातडी, अवयव किंवा प्राण्यांपासून तयार केलेली उत्पादने नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले होते. त्यासोबतच गुरांचे बाजारही बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता गुरांचे लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्यातील गुरांचे बाजार अटी व शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.

अशा आहेत अटी...

नियंत्रित क्षेत्रातील ज्या गावातील गुरांचे बाजार भरावयाचे आहेत त्या गावातील गाय व म्हैस वर्गीय गुरांचे शंभर टक्के लसीकरण झालेले असावे.

जिल्ह्यातील नियंत्रित क्षेत्रामधील केवळ संक्रमित नसलेल्या तसेच लसीकरण केलेल्या गुरांचीच वाहतूक करणे अनिवार्य राहील.

गुरांची वाहतूक करताना पशुसंवर्धन विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले आरोग्य प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. ज्या गुरांना बाजारात आणावयाचे आहे. त्या गुरांचे किमान २८ दिवसांपूर्वी लसीकरण करण्यात आलेले असावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com