Outbreak of Lumpy to 242 livestock in Satara district
Outbreak of Lumpy to 242 livestock in Satara districtAgrowon

Lumpy Skin Disease : सातारा जिल्ह्यात २४२ पशुधनांना लंम्पीचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठ तालुक्यांतील ५१ गावांमध्ये एकूण १५ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

ॲग्रोवन वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठ तालुक्यांतील ५१ गावांमध्ये एकूण १५ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तसेच सोमवारअखेर २४२ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची बाधा झाली आहे. जिल्ह्यात एकूण ८१ हजार ७४२ जनावरांचे लसीकरण (Vaccination) करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

Outbreak of Lumpy to 242 livestock in Satara district
Lumpy Scene Disease : लंपी रोगामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलं

जिल्हात कऱ्हाड, फलटण, सातारा, खटाव, कोरेगाव, पाटण, माण, खंडाळा या आठ तालुक्यांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग वाढत आहे. वाघेरी (ता. कऱ्हाड) येथे लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालेले पहिले जनावर आढळून आले होते. जिल्ह्यात एकूण ५५ जनावरांवर उपचार करून ती बरी झाली आहेत. सध्या परिस्थितीत १६० पशुधनांवर उपचार करण्यात येत आहेत.

लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्‍वभूमीवर प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील २७५ गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एक लाख १० हजार ९७६ जनावरांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. आजअखेर ८१ हजार ७४२ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, एक लाख ३१ हजार ९०० लस उपलब्ध आहे.

Outbreak of Lumpy to 242 livestock in Satara district
Lumpy Vaccination : लंपी- प्रोव्हॅकण्ड या स्वदेशी लसीची तांत्रिक चाचणी ? | ॲग्रोवन

पशुसंवर्धन आयुक्तांची पाहणी

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, संसर्ग टाळण्यासाठी जनावरांचे लसीकरण वेगाने सुरू आहे. याबाबत राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सचिद्रप्रसाद सिंह यांनी आज जिल्ह्यातील कोडोली व अतित या गावांत पाहणी केली असून, लम्पी रोखण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com