जनावरांना देखील होतो वाताचा त्रास!

जनावरांना वात झाल्यास, जनावर लंगडते. काही वेळेस जनावरांच्या मागील एका किंवा दोन्ही पायांमध्ये अपंगत्व येते. यामुळे जनावरांच्या हालचालीवर मर्यादा येतात.
Patellar Desmotomy
Patellar DesmotomyAgrowon

जनावरांना वात झाल्यास, जनावर लंगडते. काही वेळेस जनावरांच्या मागील एका किंवा दोन्ही पायांमध्ये अपंगत्व येते. यामुळे जनावरांच्या हालचालीवर मर्यादा येतात. शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. शेतात काम करणाऱ्या जनावरांमध्ये ही समस्या उद्भवल्यास कामाचे नियोजन बिघडते.

जनावर लंगडण्याची कारणे-

यामध्ये जनावरांच्या मागील पायाच्या गुडघ्याची वाटी उभ्या अवस्थेत स्थिर होते. गुडघ्याची वाटी उभी होण्यामागची अनेक कारणे आहेत. जसे की, अनुवांशिकता, पोषणातील कमतरता, कामाचा अतिरिक्त भार, वाटीच्या बाजूच्या स्नायूंचे तीव्र आकुंचन इत्यादी.

Patellar Desmotomy
भाकड काळातील गायीचे व्यवस्थापन | Dry Period Management Of Cow | ॲग्रोवन

लक्षणे

- बसल्यावर उठताना वात असलेल्या पायाने जनावर लंगडताना दिसते. जनावर पायाला झटके देत उभे राहते.
- एका पायाला वात असल्यास, तो पाय पुढे टाकताना बाहेरच्या बाजूस अर्धगोलाकार फिरवून पुढे टाकला जातो.
- दोन्ही पायांना वात असल्यास, दोन्ही पायांचा विस्तार झाल्यामुळे जनावराला खाली बसता येत नाही. चालताना पाऊल पुढे टाकताना अडचण येते.

Patellar Desmotomy
हे आहेत, वासराला चिक पाजण्याचे फायदे! | Benefits Of Colostrum Feeding To Cow Calf | ॲग्रोवन

- वात आलेल्या पायाचे स्थिरीकरण होते. वाताच्या पाय व खुराच्या वरील सांध्याचे आकुंचन होते.
- पाय सरळ उचलून पुढे न टाकल्याने जनावरांची खुरे जमिनीला घासली जाऊन खुरांच्या वरच्या भागाला जखम होते.
- वाताची लक्षणे काही काळ चालल्यानंतर दिसत नाहीत. मात्र विश्रांतीनंतर पुन्हा दिसू लागतात.

उपचार

- जनावरांच्या वातावर शस्त्रक्रिया हाच योग्य उपचार आहे.
- वात असलेल्या पायाच्या वाटीला जोडणाऱ्या आतील बाजूच्या अस्थिबंधनाची शस्त्रक्रिया केली जाते.
- शस्त्रक्रियेनंतर जनावराला काही काळासाठी विश्रांती दिली जाते.
- कमी खर्चात आणि कमी वेळात होणारी ही शस्त्रक्रिया आहे.
- मुख्य म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर जनावरांवर कामासाठी कोणतेही निर्बध राहत नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com