Lumpy Skin : जनावरांच्या बाजारभावाइतकी रक्कम द्या

लम्पी स्कीन आजारामुळे पशुधन दगावल्यानंतर राज्य सरकारकडून मिळणारी मदतीची रक्कम तुटपुंजी आहे. सरकारने ही रक्कम तत्काळ वाढवून जनावरांच्या बाजारभावा इतकी रक्कम शेतकरी पशुपालकांना द्यावी, अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

लातूर ः लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin) पशुधन दगावल्यानंतर राज्य सरकारकडून मिळणारी मदतीची (Lumpy Skin Compensation) रक्कम तुटपुंजी आहे. सरकारने ही रक्कम तत्काळ वाढवून जनावरांच्या बाजारभावा इतकी रक्कम शेतकरी पशुपालकांना द्यावी, अशी मागणी आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अडीच महिन्यांत सुमारे २५ हजार तर १५ दिवसांत ७ हजार जनावरे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, 'अॅग्रोवन'ची सविस्तर बातमी आल्यानंतर आमदार देशमुख यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली. या बाबत हिवाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुधन दगावण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडला आहे. ज्या कुटुंबाचे पोट दूध व्यवसायावर आहे, त्यांच्यावरही मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. त्यामुळे सरकारने भरीव मदत करणे आवश्यक आहे. सध्या ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे राज्य सरकार मदत देत आहे. पण ती अत्यंत कमी आहे. शिवाय ती वेळेतही शेतकऱ्यांना मिळत नाही. मिळणारी ही मदत अत्यल्प असल्याने या रकमेतून नवीन पशुधन खरेदी कसे करायचे, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. याची दखल सरकारने घ्यावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘लम्पी स्कीन’ आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ः पटोले

मुंबई : लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. मग प्रादुर्भाव होऊन जनावरे मृत्युमुखी का पडत आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पटोले यांनी म्हटले आहे, ‘लम्पी स्कीन आजारामुळे राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com