बायोगॅस सयंत्र खराब होण्याची कारणे!

बायोगॅस सयंत्राची स्थापना गोठ्याच्या जवळपास करावी. असे केल्याने शेण वाहण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागत नाही.
biogas
biogasAgrowon

बायोगॅस सयंत्राची (biogas plant) उभारणी गोठ्याच्या जवळपास करावी. असे केल्याने शेण वाहण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागत नाही. ज्या ठिकाणी बायोगॅस सयंत्राची उभारणी करायची आहे त्या ठिकाणी झाडांची मुळे नसतील, याची विशेष काळजी घ्यावी. कारण मुळाची अतिरिक्त वाढ झाल्याने बायोगॅस सयंत्राला इजा पोहोचण्याची शक्यता असते. बायोगॅस सयंत्राच्या उभारणीसाठी उंचावरची जागा निवडावी. पावसाळ्यात सयंत्राच्या सभोवताली पाणी साचणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

सयंत्र पिण्याच्या पाण्याच्या टाकीपासून १० ते १५ मीटर अंतरावर असावे. सयंत्राची उभारणी करण्याच्या जागी सूर्यप्रकाश पोहोचेल अशा जागेची निवड करावी. सयंत्र पूर्णपणे भरण्याआधी टाकीमध्ये, पाईपलाईनमध्ये छिद्रे पडलेले आहेत का? याची तपासणी करून घ्यावी.

biogas
या कारणामुळे गाय गाभण राहत नाही! | Repeat Breeding In Cow and Buffalo | ॲग्रोवन

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आतील टाकीमध्ये भरीव काठी घेऊन वाजवावी. काठीने वाजवत असताना एखाद्या ठिकाणी ठिसूळ आवाज आल्यास ती जागा दुरुस्त करून घ्यावी. गॅसच्या (gas) टाकीमध्ये कुठेही बारीक छिद्रे नसल्याची खात्री करून घ्यावी. छिद्राची तपासणी करण्यासाठी टाकित पाणी भरून पाणी बाहेर पडतंय का याचे निरीक्षण करावे.

सयंत्र सुरू करताना शेण आणि पाण्याचे गुणोत्तर शक्यतो १:१ असे घ्यावे. असे केल्याने शेणातील एकूण घनपदार्थांचे प्रमाण ८ ते ९ टक्के होऊन गॅसची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. संयत्राच्या क्षमतेनुसार शेण टाकत असताना ते योग्य मात्रेतच टाकावे. संयत्रामध्ये ज्वलनशील वायू तयार होण्यास ३५ ते ४५ दिवसांचा अवधी लागतो.

biogas
या कारणामुळे गाय गाभण राहत नाही! | Repeat Breeding In Cow and Buffalo | ॲग्रोवन

सयंत्रामध्ये ज्वलनशील गॅस तयार झाल्यानंतर, दररोज आवश्‍यक शेण पाण्याचे १:१ प्रमाणातील मिश्रण सयंत्रात भरावे. जास्तीचे शेण टाकले तर जास्तीचा गॅस तयार होत नाही. यासोबतच शेण कमी देखील पडणार नाही याची विशेष घ्यावी.

biogas
शेणखत वापरताना कोणती काळजी घ्याल? | Cow Dung Uses | Farm Yard Manure Use | ॲग्रोवन

बायोगॅस सयंत्रामध्ये बिघाड होण्याची कारणे-
- पाया भरणी व्यवस्थित झालेली नसल्यास.
- ठरलेल्या मापात बांधकाम न झाल्यास.
- बांधकामात किमान दोन ते तीन आठवडे पाण्याचा वापर न झाल्यास.
- बांधकामात वापरावयाचे समान चांगल्या प्रतीचे न वापरले गेल्यास.
- बांधकाम करणारा गवंडी पुरेसा कुशल, कसबी नसल्यास.
- बांधकामाच्या बाजूने वाळू, दगड, विटाचे तुकडे, मुरूम व पाणी यांचे मिश्रण भरून जमीन व बांधकाम यामधील मोकळी जागा न भरल्यास संयंत्र फुटण्याचा धोका असतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com