पावसाळ्यात कशी घ्याल कोंबड्यांची काळजी !

पावसाळ्यात वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. दमटपणामुळे कोंबड्यामध्ये श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
पावसाळ्यात कशी घ्याल कोंबड्यांची काळजी !
Poultry management during rainy seasonAgrowon

पावसाळ्यात (rainy season) वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो. दमटपणामुळे कोंबड्यामध्ये (poultry) श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. डास, माशांच्या वाढत्या संख्येमुळे कोंबड्यामध्ये विविध आजारांचा प्रसार होत असतो. पावसाळी वातावरण अनेक जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे पावसाळ्यात कोंबड्याच्या व्यवस्थापनात काही बदल करणे गरजेचं आहे.

पावसाळ्यात (Rainy season) जमिनीतील ओलावा वाढल्याने, नवीन गवताची वाढ जोमाने होत असते. पोल्ट्रीशेडच्या सभोवताली वाढलेले गवत काढून टाकावे. पावसाळ्यात शेडच्या आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

पोल्ट्री शेडचे छप्पर भिंतीपासून पुढे आलेले असावे. असे असल्यास पाऊस, शेडच्या आत येणार नाही. पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने, शेडमध्ये चुना मारून घ्यावा. जोरदार पावसात शेडचे पत्रे उडून जाणार नाहीत, अशा प्रकारे घट्ट बांधून घ्यावेत. पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या पडद्यांचा वापर करावा. शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पावसानुसार पडद्यांची उघडझाप करावी. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. कोंबड्यांना त्रास होत नाही.

Poultry management during rainy season
पावसाळ्यात मुक्त संचार गोठ्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे! | Loose Housing of Dairy Animals | ॲग्रोवन

डीप लिटर पद्धतीने कोंबडीपालन करत असताना पावसाळ्यात पोल्ट्रीशेडचे छप्पर तपासून घ्यावे. छपरातून पाणी गळत असल्यास लिटर ओले होण्याची दाट शक्यता असते.

पावसाळ्यात विशेषकरून शेडमधील लिटर दिवसातून दोन वेळा चांगल्या प्रकारे वर- खाली करून घ्यावे. असे केल्याने लिटरमधील ओलावा कमी होण्यास मदत होईल. लिटरमधील ओलावा वाढल्यास कोंबड्यांना कॉक्‍सीडीऑसीस (coccidiosis) आजार होण्याची शक्यता वाढते. लिटरमधील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास, ते बदलून घ्यावे किंवा त्यात चुना मिसळावा.

Poultry management during rainy season
पावसाळ्यात खुरांचे आजार बळकावतात ?

कोंबड्यांचे खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी राहील याची काळजी घ्यावी. ओलाव्यामुळे खाद्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. असे बुरशीयुक्त खाद्य कोंबड्याच्या खाण्यात येणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

पावसाळ्यात कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची प्रत तपासून घ्यावी. कारण पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित होत असतात. दुषित पाण्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होण्याचीही शक्यता अधिक असते. बाहेरील व्यक्तींना आत येण्यासाठी शेडच्या बाहेर फूटबाथचा वापर करावा. वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com