कोंबड्यांना होतात हे संसर्गजन्य आजार !

पावसाळ्यात जनावरांबरोबर कोंबड्यांनाही अनेक रोगांची बाधा होत असते. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Poultry Disease in Rainy Season
Poultry Disease in Rainy Season Agrowon

पावसाळ्यात कोंबड्यांना (poultry) अनेक रोगांची बाधा होत असते. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोंबड्यांनाही अनेक जीवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने न्यूमोनिया (Pneumonia), रक्ती हगवण, अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin), टायफॉईड (Typhoid), पुलोरम (Pulorum), पॅराटायफॉईड, कॉलरा, सीआरडी, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटिस, देवी हे आजार दिसून येतात.

कोंबड्यामध्ये आजार निर्माण करणाऱ्या विषाणू, जीवाणू आणि परजीवीचा प्रसार, कोंबड्यांची अन्ननलिका, श्वासनलिका, डोळे, शेडमधील रोगग्रस्त पक्षी यामुळे होत असतो. यासोबतच उंदीर, घुशी, शेडवर येणारे बाहेरील लोक यांसारख्या गोष्टींमुळेही होत असतो.

Poultry Disease in Rainy Season
कोंबड्या का पाळाव्यात?

आजारी कोंबड्याची विष्ठा, खाद्य आणि पाण्याद्वारे जंतूंचा प्रसार होत असतो. शेडमधील हवा खेळती नसल्यास, अस्वछ् शेडमध्ये आजाराचा प्रसार वेगाने होतो. कोंबड्यांच्या संख्येनुसार शेडमध्ये कोंबड्यांना शेडमध्ये जागा न मिळाल्याने देखील गुदमरून कोंबड्यांचा मृत्यु होतो.
डीप लिटर पद्धतीत पावसाळ्यात लिटर ओलसर राहण्याची शक्यता जास्त असते. लिटर ओले झाल्याने कोंबड्यांना कॉक्सीडियोसिस सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो.

Poultry Disease in Rainy Season
परसात कोणत्या कोंबड्या पाळाव्यात ?

कुक्कुटपालन व्यवसायामध्ये संसर्गजन्य आजारांचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे आहे. कोंबड्याचे लसीकरण करताना लसीचे नाव, बॅच नंबर, कंपनीचे नाव, वापरण्याची अंतिम मुदत आणि मात्रा यांची नोंद ठेवावी.

लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. जेणेकरून कोंबड्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही. आजारी कोंबड्यांचे लसीकरण शक्यतो करू नये. लसीकरणाचा ताण कमी करण्यासाठी लसीकरण करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तीन दिवस जीवनसत्त्वाचे मिश्रण पिण्याच्या पाण्याद्वारे द्यावे. लसीची वाहतूक योग्य प्रकारे शीत तापमानात केलेली नसल्यास लसीचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीची वाहतूक थर्मासमध्ये बर्फाचे तुकडे टाकूनच करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com