Lumpy Skin : नगर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादु्र्भाव वेगात

नगर : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वरचेवर वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र, ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भावाचा वेग झपाट्याने वाढतो आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

नगर : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) वरचेवर वाढत आहे. त्यामुले जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहीम (Vaccination Drive For Lumpy Skin) सुरू केली आहे. मात्र, ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भावाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत दहा जनावरे या आजारामुळे दगावली (Animal Dies Due To Lumpy) आहेत. लसीकरणाची संख्या वाढवली जात आहे. तसेच, २४८ किलोमीटरच्या परिसरात फॉगिंग करायचे आहे. त्यापैकी १४३ किलोमीटरमध्ये फवारणी झाली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा

आतापर्यंत नगर तालुका वगळता संपूर्ण जिल्हा व्यापला होता. मात्र आता नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील एका जनावरास बाधा झाली आहे. ‘‘पाथर्डी, श्रीरामपूर, राहुरी, राहाता तालुक्यांत जनावरे मृत पावली आहेत. २ लाख ४९ हजार ३७३ जनावरे या आजाराच्या छायेत आहेत.

२ लाख ८४ हजार २४९ जनावरांना लसीकरण करायचे आहे. त्यापैकी १ लाख २२ हजार ५१६ जनावरांना लस दिली आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर यांनी दिली. ‘‘सर्वाधिक बाधित जनावरे जामखेड तालुक्यातील आहेत. जनावरांना लस घेण्यास सांगितले आहे. त्या बाबत जनजागृतीही सुरू आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

बाधित जनावरे (तालुकानिहाय)

अकोले - ३, संगमनेर - ३, राहुरी - ५, संगमनेर - ४, नेवासा - ४, कर्जत - ५, जामखेड - ६, श्रीगोंदा- ३, पारनेर -३, राहाता - ५, नगर - १, पाथर्डी - ४, कोपरगाव - १, शेवगाव - १.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com