Lumpy Skin Disease : मेहकर तालुक्यात वाढतोय ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

आठवड्याभरात ६०० जनावरे बाधित; आतापर्यंत ८२ हून अधिक जनावरांचा मृत्यू
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

मेहकर, जि. बुलडाणा ः तालुक्यात जनावरांना लम्पी स्कीनची (Lumpy Skin Disease ) लागण वाढत असून आठवडाभरात ६०० पेक्षा जास्त जनावरे बाधित झाली आहेत. सध्या शासकीय पशुवैद्यकीय विभाग जवळपास हतबल असून पशुपालकांना खासगी पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. या तालुक्यात आतापर्यंत ८२ हून अधिक जनावरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला असल्याने या रोगाचे गांभीर्य दिसून येते.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांकडे नको दुर्लक्ष...

मेहकर तालुक्यात २१ पशुवैद्यकीय उपचार केंद्रे असून १८ डॉक्टरांची नियुक्ती आहे. लसींचा अपुरा पुरवठा, औषधींचा मर्यादित साठा यामुळे हा विभाग वाढत्या संसर्गजन्य रोगाच्या साथीला नियंत्रणात आणण्यात कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. एका उपचार केंद्राअंतर्गत जवळपास ५ गावे आणि लागण झालेल्या गुरांची वाढती संख्या यामुळे यंत्रणेवर ताण आहे.

लम्पी स्कीनचा आजार जनावरांना अधिक दिसला की, सरकारी डॉक्टर खासगी डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला देत आहेत. मेहकर, सोनाटी, वरवंड, देऊळगाव साकरशा भागात १२ तर डोणगाव परिसरात ८ जनावरांचा आतापर्यंत साथरोगाने मृत्यू झालेला असून लागण झालेल्या गुरांची संख्या सहाशेपेक्षा अधिक झालेली आहे. विशेष म्हणजे लसीकरण झालेल्या काही जनावरांना साथरोगाची लागण झाल्याचे दिसून येते. लम्पीची लागण कशी रोखायची या चिंतेत पशुसंवर्धन विभाग असून यासाठी उपचारांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन’ची मदत म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

शासनाने मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली असली तरीही तालुक्यात कुणालाही अशा प्रकारे नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचे पशुपालक सांगत आहेत. दरम्यान तालुक्यात लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत ८२ जनावारांचा मृत्यू झाला. नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले. या साथरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com