Animal Care : जनावरांमधील आदिजीवजन्य आजार

गोचीड, टॅबॅनस, हिमॅटोपोटा या प्रजातीच्या कीटकांचे नियंत्रण करावे. जोपर्यंत गोचीड (Tick), कीटकांची संख्या नियंत्रणामध्ये येत नाही, तोपर्यंत आजारांचा प्रादुर्भाव वाढत जातो. आदिजीवजन्य आजारावरील औषधे पशुवैद्यकतज्ज्ञांच्या सल्ल्याने आपल्या गोठ्यामध्ये उपलब्ध ठेवावीत.
Animal Care
Animal Care Agrowon

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे

जनावरांमध्ये लालमूत्र (Bavesiosis) (बॅवेसिओसिस), थायलेरिओसिस, सरा, कॉक्सिडिओसिस हे विविध आदिजीवी आजार (Animal Disease) पावसाळ्यामध्ये दिसतात. आजाराची लक्षणे (Disease Symptoms) तपासून उपचाराची दिशा निश्चित करावी.

१) बॅबेसिओसिस, थायलेरिओसिस हे आजार गोचिडामार्फत प्रसारित होतात. पावसाळ्यामध्ये गोचिडांची संख्या वाढते.

२) टॅबॅनस प्रजातीच्या कीटकामार्फत सरा आजाराचा प्रसार होतो. पावसाळ्यात या कीटकवर्गीय माशांची संख्या वाढते.

३) पावसाळ्यामध्ये गोठ्यातील वाढलेला ओलावा कॉक्सिडिओसिस आजारासाठी कारणीभूत ठरतो. प्रामुख्याने वासरे, करडे, कोकरांना आजार होण्याचे प्रमाण वाढते.

Animal Care
Animal Care : जनावरांतील पोटफुगीवर उपाययोजना

आदिजीवजन्य आजार नियंत्रणासाठी रूपरेषा ः

१) आजारी जनावर, वासरू, करडू, कोकरांना विलगीकरण करून तातडीने उपचार सुरू करावेत. सर्व प्रकाराच्या आदिजीवीवर प्रभावी स्वरूपाचे औषधोपचार उपलब्ध आहेत.

२) गोचीड, टॅबॅनस, हिमॅटोपोटा या प्रजातीच्या कीटकांचे नियंत्रण करावे. जोपर्यंत गोचीड व कीटकांची संख्या नियंत्रणामध्ये येत नाही तोपर्यंत या आजारांचा प्रादुर्भाव वाढत जातो.

३) करडे, वासरे, कोकरांना गोठ्यातील माती चाटण्यापासून परावृत्त करावे. जेणेकरून कॉक्सिडिओसिस आजाराचा प्रादुर्भाव थांबतो. क्षारयुक्त वीट गोठ्यामध्ये टांगती ठेवणे हा प्रभावी उपाय आहे.

४) आजारांची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. आजारावर शुश्रुषेसाठी विलंब झाल्यास ते तत्काळ तीव्र स्वरूपाचे बनतात आणि जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.

Animal Care
Animal Care : ओळखा जनावरांतील संसर्गजन्य आजाराची लक्षणे

५) सरा आजारावर शुश्रुषेबरोबरच जो औषधोपचार केला जातो, त्यामध्येच एक औषध असे आहे, की त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी त्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. या आजारावर लस उपलब्ध नाही; परंतु दिलेले रासायनिक औषध लशीचे कार्य करते. पशुपालकांनी पशुवैद्यकांकडे आग्रह धरून आपल्या परिसरामध्ये ‘सरा’ आजाराचा प्रादुर्भाव काही पशुधनामध्ये आढळल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने रासायनिक लसीकरण करून घ्यावे.

६) लहान वासरू, कोकरांना अनेक वेळेस रक्ती हगवण (कॉक्सिडिओसिस) होते. अशा वेळेस तत्काळ शुश्रुषा मिळणे आवश्यक असते. म्हणून अशा आजारावरील औषधे पशुवैद्यकतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोठ्यामध्ये उपलब्ध असावीत. लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब औषधोपचार करणे शक्य होईल.

७) गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा. एखाद्या ठिकाणी दलदल अथवा सतत ओलावा होत असल्यास चुनखडी पावडर टाकावी. यामुळे कॉक्सिडियाची अंडी आणि इतर जिवाणूजन्य आजारापासून मुक्ती मिळते.

८) लहान करडे, कोकरांना कॉक्सिडिया आजाराचा प्रादुर्भाव होऊन मृत्यू ओढवतो. अशा करडांच्या गुदद्वार व शेपटीखालील भाग सतत पातळ विष्ठेने माखलेला असतो. अशा कोकरांना कॉक्सिडिओसिस असल्याचे जास्त संभवते. यासाठी औषधोपचार आवश्यक ठरतो.

९) गायी-म्हशींच्या वासरांची पातळ विष्ठा काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. यामधून क्रिप्टोस्पोरिडीयमसारख्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ८९९९१३३३६३

(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com