पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार का वाढतात?

पावसाळ्यातील दमट वातावरण अनेक जिवाणू व विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते. परिणामी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांना होतो.
Dairy Farmers Problems
Dairy Farmers ProblemsAgrowon

पावसाळ्यातील (Rainy Season) दमट वातावरण अनेक जिवाणू व विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते. परिणामी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. वातावरणातील बदलानुसार जनावरांची काळजी घेण्यासाठी जनावरांचे आहार, आरोग्य व गोठ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यामध्ये सांसर्गिक रोगांमुळे जनावरांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील जास्त असते. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास पशुपालक बांधवांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो.

Dairy Farmers Problems
जनावरे गुदमरून का मृत्यु पावतात ?

पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारे हिरवे कोवळे गवत जनावरांनी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना पोटफुगी, अपचन यांसारख्या आजारांची बाधा होत असते. गोठ्यामध्ये किंवा जनावरे बांधण्याच्या ठिकाणी जास्त ओलावा असल्यास, त्यांना खुरांच्या आजारांची बाधा होत असते. खुरांमध्ये जखमा होऊन, त्यात आसडी पडते. पावसाळ्यात जनावरांना घटसर्प(H.S.), फऱ्या (Black Quarter), लाळ्या खुरकुत (FMD) यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

Dairy Farmers Problems
पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्याचं व्यवस्थापन | Rainy season management of animal shed | ॲग्रोवन

पावसाळ्यात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो. जनावरांनी हिरवा, कोवळा चारा मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने त्यांना जंताचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी जनावरे अशक्त बनतात. जनावरांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास जनावरांमध्ये वार बाहेर न पडणे, मायांग बाहेर येणे किंवा विल्यानंतर मिल्क फिव्हर यांसारख्या समस्या दिसून येतात.

Dairy Farmers Problems
पावसाळ्यात धार काढताना ही काळजी घ्या!

पावसाळा सुरु झाल्यांनतर बरेचदा लहान वासरांना, करडाना बुळकांडी, अतिसार, सर्दी-पडसे यांसारख्या आजारांची बाधा होत असते. गोठ्यातील वातावरण सतत ओलसर राहिल्याने, दुधाळ जनावरांमध्ये दगडीची समस्या दिसून येते.

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येतात. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याने वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास जनावरांच्या शारीरिक वाढीवर व दूध उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com