लाखमोलाच्या बैलजोड्यांची बैलपोळ्यानिमित्त खरेदी

बैलपोळ्याचे औचित्य साधून पाथर्डी, नगर तालुक्यात लाखमोलाच्या बैलजोड्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत.
Livestock Market
Livestock MarketAgrowon

नगर ः बैलपोळ्याचे (Bailpola) औचित्य साधून पाथर्डी, नगर तालुक्यात लाखमोलाच्या बैलजोड्या (Bullock Market) शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. पाथर्डीच्या आठवडे बाजारात नगर तालुक्यातील शेतकऱ्याने ३ लाख ६१ हजार रुपयांना, तर नगरमधील कामरगावच्या शेतकऱ्याने काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील जनावरांच्या बैल बाजारातून (Bull Market) २ लाख २१ हजार रुपयांची नव्या खिलारी बैलांची खरेदी केली.

Livestock Market
यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?

पाथर्डीत बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात नगर, पैठण, औरंगाबाद, जालना, बीड आदी भागांतील शेतकरी आपली जनावरे घेऊन येतात. तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील शेतकरी सादिक शेख यांनी बैलजोडी विकण्यासाठी आणली होती.

Livestock Market
Bail Pola : बैलपोळा साजरा करताना ही काळजी घ्या?

ती बैलजोडी नगर येथील शेतकरी अशोक शेळके यांना पसंत पडली. अनेक वेळ झालेल्या घासाघिशीनंतर अखेर तीन लाख ६१ हजार रुपयांना शेळके यांनी ही बैलजोडी विकत घेतली. त्यानंतर त्यांनी या बैलजोडीची डीजे लावून वाजतगाजत व गुलाल उधळत मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहायला नागरिक व शेतकऱ्यांची मोठी गर्दी केली.

नगर तालुक्यातील कामरगाव येथील प्रगतिशील शेतकरी बापू ठोकळ यांनी काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील जनावरांच्या बैल बाजारातून २ लाख २१ हजार रुपयांची नव्या खिलारी बैलांची खरेदी केली. शुक्रवारी त्यांनी कामरगाव येथे या बैलांची मिरवणूक काढली. पोळ्याला ट्रॅक्टर व बैलजोड्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा जपली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com