
गायी म्हशींनी दाखवलेला माज योग्य वेळी ओळखून रेतन केल्यास जनावर गाभण राहिल्यावर, गायीमध्ये किमान २७० ते २८० दिवसांत तर, म्हशीमध्ये ३०५ ते ३१० दिवसांत विण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. व्यायल्यानंतर (calving) पुढील किमान ५० ते ६० दिवसांत गायी, म्हशींनी पुन्हा माज दाखविला पाहिजे. अशा प्रकारे चक्र चालल्यास दुग्ध (milk) व्यवसायात निश्चितपणे फायदा होतो.
गायीला किंवा म्हशीला भरविल्यानंतर बाहेर टाकल्या जाणाऱ्या सोटाचे निरीक्षण महत्त्वाचे आस्ते. सोट चिकट, पारदर्शक असल्यास जनावर गाभण असल्याचे समजले जाते. सोटामध्ये इतर कोणते घटक किंवा बदल दिसत असल्यास योग्य वेळी पशुवैद्यकाला दाखवून घ्यावे.
जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये वारंवार (repeat breeding) उलटण्याची समस्या दिसून येते. काहीवेळेस मुका माज, जनावर माजावर न येणे यांसारख्या अडचणी दिसून येतात. वर्षाला एक वासरू मिळण्यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरांची प्रजजन संस्था निरोगी, कार्यक्षम असणे गरजेचं आहे.
जनावरांनी गाभ न पकडल्याने कोणते आर्थिक नुकसान होते ते आता पाहूयात-
- जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढते.
- वर्षाला वासराचे उत्पन्न मिळत नाही
- जनावरांच्या खाद्यावरील खर्चात वाढ होते.
- दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते.
- जनावरांच्या औषधांवरील खर्च वाढतो.
गायी, म्हशींमध्ये तीनदा योग्य वेळी रेतन केल्यानंतरही जर जनावर गाभण राहत नसेल, तर यास वारंवार उलटणे असे म्हणतात. गायी म्हशीमध्ये माजाचे चक्र दर २१ दिवसांनी येत असते.
रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झालेली असल्यास, २१ दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही.
दुधाळ गायी- म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. जिथे जास्त दूध उत्पादन, तिथे वारंवार उलटण्याचे प्रमाण जास्त दिसून आलेले आहे. वारंवार उलटण्याचे कारणे अनेक आहेत. परंतु योग्य फलनातील दोष आणि भ्रूण दोष ही मुख्य कारणे आहेत.v
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.