Animal Care : असाधारण रंगसूत्रांमुळे जनावरांमध्ये काय परिणाम दिसतात?

रंगसूत्रांमुळे आनुवंशिकतेचे गुणधर्म पुढील पिढीत संक्रमित होतात. यासाठी रंगसूत्रांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. रंगसूत्रांतील वैगुण्य व आजार यांच्यामधील संबंधाचा अभ्यास केल्याने दोष लक्षात येतात. यासाठी प्रत्येक प्रजातीतील रंगसूत्रांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. संदीप कोमटवार, डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. एम. पी. सवाने

Animal Husbandry : रंगसूत्रांमुळे आनुवंशिकतेचे गुणधर्म पुढील पिढीत संक्रमित होतात. यासाठी रंगसूत्रांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. रंगसूत्रांतील वैगुण्य व आजार यांच्यामधील संबंधाचा अभ्यास केल्याने दोष लक्षात येतात. यासाठी प्रत्येक प्रजातीतील रंगसूत्रांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

रंगसूत्रांतील विकृतीमुळे होणारे परिणाम, तसेच होणाऱ्या संततीचे लिंगनिदान व विकृती जाणून घेणे आवश्यक आहे. लैंगिक आणि अलैंगिक असे रंगसूत्रांचे प्रकार आहेत. उदा. गाईमध्ये रंगसूत्रांच्या एकूण ३० जोड्या असतात, एक जोडी लैंगिक रंगसूत्रांची आणि उर्वरित जोड्या अलैंगिक रंगसूत्रांच्या असतात.

रंगसूत्रांतील विकृतीमुळे घडणारे प्रकार -

सांख्यिकी विकृती - यामध्ये रंगसूत्रांच्या एकूण संचातील क्रमांकात पटीने बदल होतो किंवा रंगसूत्रांतील संख्या कमी किंवा जास्त होते.

संरचनात्मक विकृती - यामध्ये रंगसूत्रांत कपात होते. एकसारखी दोन रंगसूत्रे निर्माण होतात. काही वेळा अलैंगिक रंगसूत्रांतील विकृती दिसते.

ट्रायसोमी - नेहमीच्या रंगसूत्रांच्या जोडीखेरीज एक रंगसूत्र अधिक असते. यामध्ये प्रामुख्याने ट्रायसोमी-१३, ट्रायसोमी-१८ आणि ट्रायसोमी-२१ प्रकार आढळतात. ट्रायसोमी ही विकृती प्राण्यात प्राणघातक असते. यामुळे गर्भाच्या वाढीवर तीव्र परिणाम होतो.

Animal Care
Animal Care : आयोडीन कमतरतेमुळे जनावरांवर काय परिणाम होतो?

लैंगिक रंगसूत्रांतील विकृती -

१) टर्नर सिंड्रोम लक्षणे (XO) - या विकृतीमध्ये एकच लैंगिक रंगसूत्र असते.अशा विकृतीच्या प्राण्यांची लैंगिक वाढ खुंटलेली असते.

२) क्लेनफेल्टर सिंड्रोम लक्षणे (XXY)- या नरांमध्ये मादीचे गुणधर्म अधिक असतात.

३) सुपर फिमेल किंवा मेटा फिमेल लक्षणे (XXX) - असाधारण गुणधर्म, उंच सडपातळ असतात.

४) जॅकोब्ज मेल लक्षणे (XXY): असाधारण उंची, वांझ व लैंगिक वाढ खुंटते.

५) टेट्रासोमी लक्षणे (XXXY) : संपूर्ण नर किंवा मादी यात पुष्कळशा बाबतीतील लक्षणे मध्यावर असतात.

६) मोझॅक आणि कायमेरा लक्षणे : यामध्ये विविध प्रकारची लैंगिक रंगसूत्रे आढळतात उदा. XX /XY , XX /YY, xx/XY /XO इत्यादी .

७) फ्रीमार्टिन लक्षणे : जुळे जन्माला येतात. यामध्ये मादी वांझ आणि नर साधारण असतो.

कारणे

- अर्धसूत्री विभाजनाच्या वेळी रंगसूत्रे वेगळे न होणे.

- अर्धसूत्री विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये युग्मकपेशीची प्रत्येक सजीवातील संख्या ठरलेली असते. ही संख्या कायम राहण्यासाठी अर्धसूत्री विभाजनाची आवश्यकता असते.

- या पद्धतीच्या विभाजनात प्रथम मूळ रंगसूत्रांची संख्या दुप्पट होते. त्यानंतर विभाजन होऊन प्रत्येक द्विगुणित युग्मक पेशींमध्ये मूळ गुणसूत्रांच्या एकगुणित एकेरी संख्या निर्माण होते. अशा प्रकारची एकगुणित सूत्रे असणारी नर व मादी युग्मक पेशींचा संयोग होऊन फलन होते.

Animal Care
Animal Care : लठ्ठपणामुळे जनावरावर काय परिणाम होतो?

उत्परिवर्तनामुळे रंगसूत्रांत होणारे बदल

- जनावराच्या रंगसूत्रांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे त्यांच्या आनुवंशिकतेने संक्रमित होणाऱ्या नैसर्गिक गुणधर्मामध्ये बदल दिसून येतात.

- किरणोत्सर्गी, रासायनिक पदार्थ इत्यादी कारणांमुळे उत्परिवर्तन घडते.

उपाय :

- जनावराच्या रंगसूत्रांत अनियमितता असल्यास त्यावर उपाय नाही, उलट अशा प्रकारचा दोष आढळल्यास सदरील जनावरास कळपातून काढून टाकावे. नराचे खच्चीकरण करावे जेणेकरून सदरील विकृती पुढील पिढीत संक्रमित होणार नाही.

- जनावराची खरेदीपूर्वी रंगसूत्रांची चाचणी करणे आवश्यक आहे.

संपर्क - डॉ. संदीप कोमटवार, ८०८०९८८९९९, (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com